शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सुधन्वा गोंधळेकर याच्यावर पुण्यात दाखल होता खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:47 IST

गणेशखिंड रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅगिग प्रकरणातून एकाचा खुन झाला होता़.या प्रकरणात सुधन्वा गोंधळेकर (वय २१, रा़ करंजे फाटा, सातारा) आणि सचिन कुलकणी या दोघांना २९ मार्च २००० रोजी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली होती़.

ठळक मुद्देरॅगिंगमधून घडला होत प्रकार : न्यायालयात झाली होती निर्दोष मुक्तता पुणे, सातारा, सोलापूर भागातून एटीएसच्या पथकाने बारा जणांना चौकशीसाठी घेतले ताब्यात

पुणे : राज्य दहशतवाद विरोधी पथकाने वैभव राऊत याला मदत करणाऱ्या सुधन्वा गोंधळेकर याला अटक केली असून त्याला पुण्यात २००० साली खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती़. एटीएसने शनिवारी त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे़. गणेशखिंड रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅगिग प्रकरणातून एकाचा खुन झाला होता़. या प्रकरणात सुधन्वा गोंधळेकर (वय २१, रा़ करंजे फाटा, सातारा) आणि सचिन कुलकणी या दोघांना २९ मार्च २००० रोजी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली होती़. या खटल्याचा १५ सप्टेंबर २००३ रोजी निकाल लागला असून त्यातून दोघांची पुराव्या अभावी निर्दौष मुक्तता करण्यात आली होती़. दरम्यान, एटीएसने सुधन्वा गोंधळेकर याच्याकडून शनिवारी मोठा शस्त्र साठा जप्त केला आहे़. त्यात १० गावठी पिस्तुल मॅगझिनसह, १ गावठी कट्टा, १ एअरगन, १० पिस्टल बॅरल, ६ अर्धवट तयार पिस्टल बॉडी, ६ पिस्टल मॅगझिन, ३ अर्धवट तयार मॅगझीन, ७ अर्धवट तयार पिस्टल स्लाईउ, १६ रिले स्विच, ६ वाहनांच्या नंबर प्लेटस, १ ट्रिगर मॅकॅनिझम, १ चॉपर, १ स्टील चाकू असा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे़ तसेच इतर अर्धवट बनलेले शस्त्राचे सुटे भाग, टॉर्च, बॅटरी, हँड ग्लोव्हज, इतर अनुषंगिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पुस्तके, स्फोटकाबाबत हँड बुक, एक्प्लोसिव्ह व मोबाईल प्रिंटआऊट, रिले स्विच सर्किट ड्रॉईग, पेनड्राईव्हज, हार्डडिक्स, मेमरी कार्ड इत्यादी साहित्य जप्त केले आहे़. दरम्यान, पुणे, सातारा, सोलापूर भागातून एटीएसच्या पथकाने बारा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. राऊत, कळसकर, गोंधळेकर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. दरम्यान, राऊत, कळसकर, गोंधळेकर यांच्या संपर्कात असलेल्या बारा जणांना एटीएसकडून शनिवारी ताब्यात घेण्यात आले. एटीएसच्या मुंबई पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी राऊत आणि त्याचे साथीदार मुंबई, पुणे, सोलापूर भागात घातपाती कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा संशय एटीएसकडून व्यक्त करण्यात आला. गोंधळेकर मूळचा साताऱ्यातील आहे. त्याचा पुण्यात ग्राफिक डिझायनिंगचा व्यवसाय असल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :PuneपुणेAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथकCrimeगुन्हाArrestअटक