शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू डासाची उत्पत्तीस्थळे आढळलेल्यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 21:01 IST

गेल्या दीड महिन्यात जूनपासून आतापर्यंत शहरामध्ये तब्ब्ल दीड लाख घरांमध्ये उत्पत्तीस्थनांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देशहरात २ हजार ४०० नागरिकांना नोटीसा :  २८ हजार जणांना दंड एडिस इजिप्त डासांच्या अळ्या आढळून आलेल्या तब्बल २८ हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई वारंवार नोटीसा देऊन देखील ही उत्पत्तीस्थळे नष्ट न करणा-या १० ते १२ लोकांवर गुन्हे दाखल डेंग्यू नियंत्रण करण्यासाठी कोरडा दिवस पाळा

पुणे: शहरात डेंग्यू, मलेरिया साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने कडक उपाययोजना करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात शहराच्या विविध भागात तपासणी करून ‘एडिस इजिप्त’ डासांच्या अळ्या आढळून आलेल्या व वारंवार नोटीसा देऊनही उत्पत्तीस्थळे नष्ट न करणा-यांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आले.दरवर्षी पावसाळ््यामध्ये शहरामध्ये डेंग्यू, मलेरिया या साथीच्या आजाराचा उद्रेक होतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरामध्ये  मोठ्या प्रणाणात ‘एडिस इजिप्त’ डासांच्या अळ्यांच्या उत्पत्तीस्थानांची तपासणी करण्यात आली. गेल्या दीड महिन्यात जूनपासून आतापर्यंत शहरामध्ये तब्ब्ल दीड लाख घरांमध्ये उत्पत्तीस्थनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एडिस इजिप्त डासांच्या अळ्या आढळून आलेल्या तब्बल २८ हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर २ हजार ४०० लोकांना नोटीसा देण्यात आल्या. यामध्ये वारंवार नोटीसा देऊन देखील ही उत्पत्तीस्थळे नष्ट न करणा-या १० ते १२ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले अशी माहिती, प्रभारी आरोग्य प्रमुख वैशाली जाधव यांनी दिली.----------------या लोकांवर झाले गुन्हे दाखलविरेद्र एस.कट्टी, बहिरट पाटील बिल्डींग, शिवाजीनगर, हेमंत रामचंद्र लोखडे, बोपदेव घाट, कोंढवा, कृष्णा बाबू सुर्वे, मार्केट यार्ड, डी.बी.रीयालटी बांधकाम, येरवडा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.-------------------डेंग्यू नियंत्रण करण्यासाठी कोरडा दिवस पाळाघरात, घरालगतच्या परिसरात साठलेल्या किंवा सावलेल्या स्वच्छ पाण्यात ‘एडिस इजिप्ती’ हा डेंग्यू, मलेरिया साथीचा आजार पसरविणारे डासांची उत्पत्ती होते.साठलेल्या पाण्यात डासांच्या विविध अवस्था या साधारणपणे आठ दिवसांपर्यंत असतात. त्यामुळे असे साचलेले पाणी  सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळल्यास डेंग्यू, मलेरियावर नियंत्रण ठेवता येईल. त्यामुळे शहरातील प्रत्येक घरात आठवड्यातून एक दिवस तरी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेdengueडेंग्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिस