शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोणी कोळभोर येथे वीज चोरी करणा-या पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 19:44 IST

अनधिकृतरित्या वीज पुरवठा घरात जोडून वीज वापराची नोंदणी मिटरवर होणार नाही अशी व्यवस्था करून वीजचोरी करत असल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्देपती पत्नी यांनी मिळून दोन लाख बावन्न हजार किमतीची वीज चोरी केल्याचे निष्पन्न

लोणी काळभोर : गेल्या दोन वर्षांपासून वीज मिटरच्या आत जाणा-या खोक्याच्या मागे छिद्र करून वायर जोडत अनधिकृतरित्या वीज पुरवठा घरात जोडून वीज वापराची नोंदणी मीटरवर होणार नाही अशी व्यवस्था करून वीजचोरी करणा-या पती - पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरारी पथक कृष्णानगर, सातारा चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता देवाशिष चित्तरंजन दत्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, महिंद्र लक्ष्मण चोरघे ( वय ४५ ) व मंगल चोरघे ( वय ४०, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली ) या पती - पत्नी विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          दत्ता यांचेकडे महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीने वीज ग्राहकांच्या मीटर व जोडभाराची तपासणी करणे, वीजचोरी करणा-या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे, अनधिकृत वापरांस अटकाव करणे. आदी कामे सोपवली आहेत.     काही दिवसांपूर्वी सदर पथक कुंजीरवाडी परिसरातील मीटरची तपासणी करत असताना चोरघे यांचे घरी गेले असता त्यांना त्याठिकाणी दोन मीटर दिसले. तपासणी केली असता या दोन्ही मीटरच्या आत जाणा-या खोक्याच्या मागे छिद्र करून वायर जोडून अनधिकृतरित्या वीज पुरवठा घरांत जोडून वीज वापराची नोंदणी मिटरवर होणार नाही अशी व्यवस्था करून वीजचोरी करत असल्याचे निदर्शनास आले. कायदेशीर कारवाई करून मिटर सिल करण्यात आले. पथकाने वीजचोरीची पडताळणी केली असता त्यांना गेले दोन वषार्पासून सदर चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये मछिंद्र चोरघे यांनी १ लाख ३३ हजार ९०६ रुपये किमतीची ९८७० युनिट तर मंगल चोरघे यांनी १ लाख १९ हजार ४३ रुपये किमतीची ९७४३ युनिट वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या पथकाने तडजोडीची रक्कम म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये भरण्यांस सांगितले. परंतु, ते न भरलेले शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरmahavitaranमहावितरणCrimeगुन्हाPoliceपोलिस