शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

गुन्हे शाखेचा ६ पबवर छापे घालून २०० बाटल्या दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 10:16 AM

पोलिसांनी तेथून साडेतीन लाख रुपयांच्या १४७ दारुच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच बेकायदेशीरपणे दारु विक्री केल्याबद्दल पबचे ३ मालक, २ मॅनेजर आणि ३ वेटरवर गुन्हा दाखल केला. तसेच डीजेवर कारवाई केली आहे

पुणे : उशिरापर्यंत सुरु असलेल्या पबवर गुन्हे शाखेने छापे टाकून रविवारी पहाटे ६ पबवर कारवाई केले. बेकादेशीरपणे दारू विक्री होत असल्याचे आढळून आल्यावर त्यातील दोन पबमधून साडे चार लाख रुपयांच्या १९६ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत प्लेबॉय हा पब पहाटे पर्यंत सुरु होता. प्रत्यक्षात या पबचे रजिस्टर नाव वेगळे आहे. तेथे मोठमोठ्या आवाजात म्युझिक सुरु होते. डान्स फ्लोअरवर अनेक तरुण तरुणी नृत्य करीत होते. तसेच तेथे बेकायदेशीरपणे दारूची विक्री केली जात होती. पोलिसांनी तेथून साडेतीन लाख रुपयांच्या १४७ दारुच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच बेकायदेशीरपणे दारु विक्री केल्याबद्दल पबचे ३ मालक, २ मॅनेजर आणि ३ वेटरवर गुन्हा दाखल केला. तसेच डीजेवर कारवाई केली आहे. 

लॉडर्स ऑफ ड्रिक्स या येरवड्यातील पबवर पोलिसांनी कारवाई करुन तेथून १ लाख १ हजार ६३५ रुपयांच्या ४९ दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पबचा मालक, १ मॅनेजर आणि ३ वेटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय नियमभंग करणाऱ्या बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २बीएचके पब, केनो पब, मिलर पब, बोटॅनिके पब अशा चार पबवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सकट, विशाल, माऊली पवार यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस