शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाळलेल्या मांजरींची हालअपेष्टा करणाºया महिलांवर गुन्हा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:25 IST

मांजर, कुत्रा पाळणे हे आता शहरांमध्ये स्टेटस सिम्बॉल बनत चालले आहे़ पण स्वत:च्या हौसेखातर सोसायटीतील इतर रहिवाशांना किती त्रास होतो, याचा अनेक जण विचारच करत नाही़ एकवेळ एक-दोन प्राणी पाळणे समजू शकेल, पण तब्बल २० ते २५ मांजरी पाळल्या तर काय होईल, याची कल्पनाच केलेली बरे.

पुणे : मांजर, कुत्रा पाळणे हे आता शहरांमध्ये स्टेटस सिम्बॉल बनत चालले आहे़ पण स्वत:च्या हौसेखातर सोसायटीतील इतर रहिवाशांना किती त्रास होतो, याचा अनेक जण विचारच करत नाही़ एकवेळ एक-दोन प्राणी पाळणे समजू शकेल, पण तब्बल २० ते २५ मांजरी पाळल्या तर काय होईल, याची कल्पनाच केलेली बरे़ इतक्या मांजरी एका फ्लॅटमध्ये कोंडून ठेवल्याने त्यांच्या मलमूत्रामुळे दुर्गंधी सुटून इतर रहिवाशांना त्रास होऊ लागला़ शेवटी कोंढवा पोलिसांनी या मांजरी पाळणाºया दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़दीपिका कपूर व संगीता कपूर (रा़ ब्रम्हा होरिझन सोसायटी, कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत़ त्यांच्यावर प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे़ याप्रकरणी अ‍ॅनिमल वेलफेअर अधिकारी मेहेर मथरानी (वय ५३, रा़ उदयबाग, सोपानबाग) यांनी फिर्याद दिली आहे़याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले, की दीपिका व संगीता कपूर यांचा ब्रम्हा होरिझन सोसायटीत एक फ्लॅट आहे़ त्यात त्यांनी नोव्हेंबर २०१४ पासून मांजरी पाळण्यास सुरुवात केली़ पुढे त्यांची संख्या वाढत गेली़ सुरुवातीला त्या दोघी त्या फ्लॅटमध्ये राहत होत्या़या मांजरीची संख्या वाढत जाऊन ती २० ते २५ पर्यंत पोहोचली़ त्यामुळे त्यांचे मलमूत्र फ्लॅटमध्येच होत होते़ स्वच्छता न केल्याने याचा या दोन्हींना त्रास होऊ लागला़ तेव्हा त्यांनी सुमारे एका वर्षापूर्वी जवळच भाड्याने फ्लॅट घेऊन तेथे राहू लागल्या़ या मांजरींना फ्लॅटमध्ये कोंडून ठेवल्याने त्यांची हालअपेष्टा होऊ लागली. स्वच्छता न केल्याने शेजारी राहणाºया इतर फ्लॅटधारकांना त्याच्या दुर्गंधीचा त्रास होऊ लागला व त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला़ त्यामुळे रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार करण्यास सुरुवात केली़दरम्यान, ही बाब अ‍ॅनिमल वेलफअर अधिकारी मेहेर मथरानी यांना समजली़ त्यांनी तेथे जाऊन पाहणी करून कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा