शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयकडून अलाहाबाद बँकेच्या पुण्यातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 23:20 IST

अलाहाबाद बँकेच्या हिंजवडी शाखेतील नॅशनल इन्शुरन्स अ‍ॅकॅडमीच्या मुदती ठेवी मुदतीपूर्वीच बंद करून त्यातील १ कोटी ६० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)ने अलाहाबाद बँकेच्या पुण्यातील ४ अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे : अलाहाबाद बँकेच्या हिंजवडी शाखेतील नॅशनल इन्शुरन्स अ‍ॅकॅडमीच्या मुदती ठेवी मुदतीपूर्वीच बंद करून त्यातील १ कोटी ६० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)ने अलाहाबाद बँकेच्या पुण्यातील ४ अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिका-यांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात आली.अरुण गोपाळ देशपांडे, पल्लवी मुखर्जी, निशा प्रकाश आणि गायत्री प्रधान अशी या चार अधिका-यांची नावे आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी, अरुण देशपांडे हे अलाहाबाद बँकेच्या हिंजवडी शाखेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना २०१२ -१३ मध्ये नॅशनल इन्शुरन्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने दीड कोटी रुपयांची मुदत ठेव बँकेत २ वर्षांसाठी ठेवण्यात आली होती. त्याची मुदत १८ मे २०१४ रोजी संपणार होती. परंतु त्यापूर्वीच देशपांडे यांनी मुदत ठेव खाते बंद केले. त्यांनी अन्य अधिका-यांशी संगनमत करून या खात्यातील रक्कम स्वत:च्या खात्याबरोबरच विविध खात्यात हस्तांतरीत करण्यात आली. दरम्यान त्यांची बदली हिंजवडीवरून बँकेच्या लक्ष्मी रोड शाखेत करण्यात आली. त्यांनी या मुदत ठेवीच्या व्याजाची रक्कम अन्य लोकांच्या खात्यावर हस्तांतरीत केली. बदली झाल्यानंतरही त्यांचा हा प्रकार सुरू होता. यामुळे १ कोटी ६० लाख ५९ हजार ९९४ रुपयांची अफरातफर केल्याचे उघडकीस आले.सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या चारही अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचे पोलीस निरीक्षक मनीष प्रभुणे अधिक तपास करीत आहेत.