शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘युगनायक विवेकानंद’ संगीतमय चरित्रपटाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 13:55 IST

जाणता राजाच्या धर्तीवर युगनायक विवेकानंद या चरित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पोवाडा, अभंग, भजन, कव्वाली, शास्त्रीय संगीत अशी विविध स्वरूपाची १७ गीते आहेत.

ठळक मुद्देपं. संजीव अभ्यंकर, अवधूत गुप्ते यांच्यासह नवोदित गायकांच्या स्वरांत ही गीते स्वरबद्ध

पुणे : माझ्या बंधू-भगिनींनो... या स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्म परिषदेत दिलेल्या व्याख्यानाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून रामकृष्ण मठाच्या पुणे केंद्रातर्फे ‘युगनायक विवेकानंद’ या संगीतमय चरित्रपट तयार करण्यात आला आहे.  पुण्यात विवेकानंद ज्ञानपीठाची निर्मिती करण्यात येत आहे. त्याच्या उभारणीसाठी या चरित्रपटाच्या शुभारंभाचे दोन प्रयोग पुण्यात होणार आहेत.रामकृष्ण मठाच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंदजी यांनी ही माहिती दिली. या चरित्रपटाचे संगीत दिग्दर्शक केदार पंडित, प्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर, नृत्यदिग्दर्शिका अमीरा पाटणकर ,मधुरा आफळे आणि कार्यकारी दिग्दर्शक नचिकेत जोग उपस्थित होते.या चरित्रपटाचे कथालेखक आणि गीतकार स्वामी श्रीकांतानंदजी आहेत. पुण्यातील प्रयोगांनंतर या चरित्रपटाचे प्रयोग राज्यातील प्रमुख शहरांत सादर केले जाणार आहेत. स्वामी श्रीकांतानंदजी म्हणाले, रामकृष्ण मठाच्या परिसरात विवेकानंद ज्ञानपीठाची उभारणी करण्यास प्रारंभ झाला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च येणार आहे. येत्या चार वर्षांत हे ज्ञानपीठ उभे राहील. त्यात भाषा, संस्कृती आणि मूल्यशिक्षण याविषयीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संस्कृती आणि मूल्य शिक्षण देणारे विवेकानंद स्कूल आॅफ कल्चर, विविध परकीय भाषांचे ज्ञान देणारी निवेदिता स्कूल आॅफ लँग्वेजेस,  एम. ए. अभ्यासक्रम आणि आॅनलाईन अभ्यासक्रमाची सुविधा असलेले वेद संस्कृती विद्यालय यांचा समावेश आहे.  चरित्रपटाच्या प्रयोगातून मिळणारा निधी हा मठाच्या विविध कार्यांसाठी खर्च केला जाणार आहे. केदार पंडित म्हणाले, जाणता राजाच्या धर्तीवर युगनायक विवेकानंद या चरित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पोवाडा, अभंग, भजन, कव्वाली, शास्त्रीय संगीत अशी विविध स्वरूपाची १७ गीते आहेत. पं. संजीव अभ्यंकर, अवधूत गुप्ते यांच्यासह नवोदित गायकांच्या स्वरांत ही गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. माध्यमातून स्वामी विवेकानंद यांच्यावरील महानाट्याचे स्वप्न साकार झाले आहे. संजीव अभ्यंकर म्हणाले, या चरित्रपटाचे महानायक स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिरेखेसाठी माझा आवाज वापरला गेला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या मनात उमटलेली, स्वामी श्रीकांतानंदजी यांनी गीताच्या रूपात मांडलेली आणि केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेली भावना माझ्या आवाजातून व्यक्त होते.

टॅग्स :PuneपुणेSwami Vivekanandaस्वामी विवेकानंदAwadhoot Gupteअवधुत गुप्ते