शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांसाठी राज्यात डायलिसिस केंद्र उभारा : शिवकुमार डिगे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 20:31 IST

गरीब रुग्णांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून देणे हा धर्मादाय कार्यालयांचा कामाचा भाग आहे.

ठळक मुद्देडायलिसिससाठी लागणारा खर्च सर्वसामान्य व गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर

पुणे: राज्यात डायलेसिस सेंटरची संख्या कमी असल्याने गरीब रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उपचार महाग असल्याने गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे जिल्हा स्तरावरील धर्मादाय रुग्णालयाच्या सहकार्याने किंवा खासगी रुग्णालयांची मदत घेवून जिल्हा व तालूका स्तरावर डायलिसिस केंद्र उभारावेत, अशा सूचना राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिल्या आहेत.राज्यात अनेक जिल्ह्यात व तालुक्यात डायलिसिस केंद्र उपलब्ध नाहीत. डायलिसिससाठी लागणारा खर्च सर्वसामान्य व गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर जात आहे.विश्वस्त संस्थांनी कायद्यानुसार गरीब रुग्णांना सेवा देणे आवश्यक आहे. धर्मादाय संस्थांचे पालनकर्ता म्हणून विविध धर्मादाय संस्थांमार्फत गरीब रुग्णांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून देणे हा धर्मादाय कार्यालयांचा कामाचा भाग आहे.धर्मादाय कार्यालयांमार्फत प्रत्येक जिल्हा स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.या समित्यांच्या सहकार्यातून किंवा धर्मादाय व खासगी रुग्णालयांची मदत घेवून डायलिसिस केंद्र उभारण्यास प्रोत्साहन द्यावे,असे आदेश डिगे यांनी राज्यातील सर्व सहधर्मादाय आयुक्त कार्यालयांना दिले आहेत. डिगे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात व तालुका स्तरावर डायलिसिस सेंटर स्थापन करण्यासाठी व सेंटर कार्यरत राहण्यासाठी जिल्ह्यातील धार्मिक स्थळांकडून किंवा सामाजिक,शैक्षणिक संस्थाकडून निधी घ्यावा.मात्र,हा निधी घेताना कोणत्याही संस्थेवर दबाव टाकू नये. संबंधित निधी जिल्हा स्तरावरील समितीमार्फतच स्वीकारावा. जिल्हा स्तरावर समिती नसेल तर धर्मादाय रुग्णालयांमार्फत स्वीकारून त्याचा चोख हिशोब ठेवावा. त्याचप्रमाणे वाद असणा-या संस्थांमधून निधी घेवू नये. डायलेसिस सेंटर सुरू झाल्यानंतर गरीबांंना मोफत किंवा नाममात्र दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत.

टॅग्स :Puneपुणेdialysisडायलिसिस