शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडी लोहमार्गालगत लष्करी जवानाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:42 IST

घोरपडीतील लोहमार्गालगत एका लष्करी जवानाचा मृतदेह रविवारी दुपारी आढळून आला. मुंढवा येथील सिग्नल ग्रुप हेडक्वार्टरमधील जवान रमेश (वय २८, रा़ घोरपडी, मूळ गाव वेल्लोर, तमिळनाडू) असे त्यांचे नाव आहे. ते २७ जुलैपासून बेपत्ता होते.

पुणे : घोरपडीतील लोहमार्गालगत एका लष्करी जवानाचा मृतदेह रविवारी दुपारी आढळून आला. मुंढवा येथील सिग्नल ग्रुप हेडक्वार्टरमधील जवान रमेश (वय २८, रा़ घोरपडी, मूळ गाव वेल्लोर, तमिळनाडू) असे त्यांचे नाव आहे़ ते २७ जुलैपासून बेपत्ता होते़ याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार देण्यात आली होती़ आत्महत्या करण्यापूर्वी जवानाने कुटुंबीयांना लिहिलेली चिठ्ठी घटनास्थळी सापडली असून, आत्महत्येला कोणालाही दोषी धरू नये, असे त्यात म्हटले आहे़घोरपडी लोहमार्गालगत रविवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. रेल्वेचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी पाहणी केल्यानंतर तेथे कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्या वेळी तेथे एका लष्करी जवानाचा मृतदेह असल्याचे आढळून आले. ओळखपत्रावरून रमेश यांची ओळख पटविण्यात आली़ या प्रकरणाची तातडीने लष्कराला माहिती देण्यात आली. त्यानंतर तेथे लष्करी जवान मोठ्या संख्येने दाखल झाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह हलविण्यात आला़ आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही़लष्करी जवान रमेश अविवाहित होते. त्यांना दोन बहिणी आणि भाऊ आहे. त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले आहे. मृत्यूनंतर पैसे छोटी बहीण, तसेच भावाला देण्यात यावेत. मी आईवडिलांकडे चाललो आहे.तुम्ही शिक्षण घ्या, स्वत:ची काळजी घ्या. माझ्या मृत्यूला कोणालाहीदोषी धरू नये, असे रमेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणे