शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पोटाची खळगी भरण्यासाठी महिला चालवितात क्रेन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 16:58 IST

विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातून अनेक कुटुंबे रोजगारासाठी पुणे जिल्ह्यात आलेली आहे.

ठळक मुद्देमहिलांचे कष्ट पाहण्यासाठी परिसरातील लोकांची गर्दी

चाकण : पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्यापरीने कष्ट मोजत असतो. यात आत्ताच्या काळानुसार, महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने खांदा लावून पडेल ते काम करण्यात तत्परता दाखवत आहे. याच गोष्टीचा प्रत्यय तुम्हाला खान्देशातून विहीर खोदकाम करण्यासाठी चाकण येथे आलेल्या कुटुंबातील महिलांकडे पाहून येतो. कारण या कुटुंबातील काही महिला चक्क महिला क्रेन चालवित आहे.विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातून अनेक कुटुंबे रोजगारासाठी पुणे जिल्ह्यात आलेली आहे. अनेक तरुणांनी चाकण औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकऱ्याही मिळवल्या आहे. तर अनेक कुटुंबे कष्टाचे काम करून आपला उदरनिर्वाह करतानाचे चित्र या परिसरात दिसत आहे.  कडाचीवाडी येथील माजी उपसरपंचाच्या विहीर खोदकाम सुरु असून या कामासाठी जळगाव जिल्ह्यातील जाधव व झाकणे ही दोन कुटुंब आपल्या मुलाबाळांसह आली आहे. त्यांनी शेतातच तंबू टाकून आपला संसार मांडला असून या कुटुंबातील महिला अक्षरश: उरा पोटावर दगड उचलून क्रेनमध्ये भरतात व महिलाच क्रेन चालवत आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या महिलांचे कष्ट पाहण्यासाठी परिसरातील लोक गर्दी करत आहे. या घटनेने १९७२ च्या दुष्काळातल्या कामांचीच एकप्रकारे आठवण झाली. त्यावेळी देखील लोकांनी मिळेल ते काम करत कुटंबाचा उदरनिर्वाह केला. यातूनच  खेड तालुक्यात सर्वाधिक विहिरी व पाझर तलाव खोदकामे झाली. ==================

टॅग्स :ChakanचाकणWaterपाणीWomenमहिला