शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या कर्मचा-यांना दिलासा, सानुग्रह अनुदान देण्याचे न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 21:53 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) तोट्यात असल्याचे कारण देत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिल्यानंतर औद्योगिक न्यायालयाने कर्मचा-यांना दिलासा दिला आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) तोट्यात असल्याचे कारण देत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिल्यानंतर औद्योगिक न्यायालयाने कर्मचा-यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाचे सभासद एस. व्ही. सुर्यवंशी यांनी सर्व कर्मचा-यांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान व १२ हजार रुपये बक्षीस देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासन नक्की काय भूमिका घेते याकडे कर्मचा-यांचे लक्ष लागून राहिले आहे. पीएमपी तोट्यात असून, कर्जबाजारी असल्याने कर्मचा-यांना यंदा सानुग्रह अनुदान व बोनस देण्यात येणार नसल्याचे मुंढे यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. त्यामुळे महामंडळातील कर्मचारी संघटनांनी औद्योगीक न्यायलयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. त्यात १९९७ साली झालेल्या करारानुसार सानुग्रह अनुदान व १२ हजार रुपये बक्षीस देण्यात यावे असा आदेश न्यायालयाने दिला. यावर्षी मंडळाचा तोटा ३४३ कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. तसेच दोन्ही महापालिकांकडेही कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. तर पुणे महापालिकेकडूनही काही रक्कम येणे बाकी आहे. त्यामुळे बोनस, सानुग्रह अनुदान देणे शक्य नाही, अशी भूमिका मुंढे यांनी घेतली होती. त्याबाबात कामगार संघटनांना नोटीसही देण्यात आली होती. मात्र मुंढे यांच्या निर्णयाला औद्योगिक न्यायालयाने रद्दबातल ठरवलिले आहे.  दरम्यान, कर्मचा-यांना बोनस मिळावा यासाठी पी. एम.टी कामगार संघ (इंटक) आणि राष्ट्रवादी कामगार जनरल युनियन आणि संबंधित संघटनांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याप्रकरणात पीएमपी प्रशासनातर्फे अ‍ॅड. वाचासुंदर आणि इंटकच्या वतीने अ‍ॅड. नितीन कुलकर्णी यांनी काम पाहिले, अशी माहिती इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे आणि उपाध्यक्ष अशोक जगताप यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय