शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

घटस्फोट घेणा-यांची जुळली मने, मुलाच्या भवितव्यासाठी दाम्पत्य पुन्हा एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 03:12 IST

मोठा व्यवसाय करणारा पती आणि एका चांगल्या कंपनीत अधिकारी म्हणून कामावर असणारी पत्नी यांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे ते वेगळे झाले होते. त्यामुळे पतीने न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी दावा दाखल केला

पुणे : मोठा व्यवसाय करणारा पती आणि एका चांगल्या कंपनीत अधिकारी म्हणून कामावर असणारी पत्नी यांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे ते वेगळे झाले होते. त्यामुळे पतीने न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी दावा दाखल केला; मात्र तुटण्याच्या वाटेवर असलेला त्यांचा संसार लोकअदालतीमध्ये झालेल्या समुपदेशनाने पुन्हा जुळला.न्यायालयातील प्रलंबित दाव्यांची आकडेवारी कमी व्हावी. तसेच, दाखलपूर्व दावे सामंजस्याने आणि समुपदेशनाद्वारे निकाली काढण्यात याव्यात, यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दर तीन महिन्यांनी लोकअदालतीचा उपक्रम आयोजित करण्यात येतो. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणर्फे प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख न्यायाधीश श्रीराम मोडक, प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. त्यात अनेक पक्षकारांना दिलास मिळाला. लोकअदालतीमध्ये घटस्फोटाच्या वाटेवर असलेल्या उच्चशिक्षित दाम्पत्याचे समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे त्यांनीमतभेद बाजूला ठेवून पुन्हा एकत्र येण्याचे ठरविले. या खटल्यातील पक्षकार पतीने न्यायालयात २०१२मध्ये घटस्फोट मिळावा म्हणून दावा दाखल केला होता. पत्नीबरोबर सतत भांडणे होत असल्यामुळे त्याने हा दावा दाखल केला होता.सहा वर्षांपासूनचा वाद संपलागेल्या सहा वर्षांपासून अर्जदार आणि त्याची पत्नी वेगळे राहात आहेत. त्यांना अकरा वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्यात समेट घडावी म्हणून त्यांचे नातेवाईक आणि मध्यस्थांनी अनेकदा प्रयत्न केले होत. मात्र, त्यांच्यातील वाद संपला नव्हता. त्यांच्या घटस्फोटाचा हा दावा लोकअदालतमध्ये ठेवण्यात आला.लोकअदालतमध्ये त्यांनी आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार करून या दाम्पत्याने तडजोड केली. तसेच पुन्हा एकत्र येण्याचे ठरविले. त्याचप्रमाणे न्यायालयात दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला. त्यांच्यातर्फे अ‍ॅड. देवराम झंजाड, अ‍ॅड. हेमंत झंजाड, अ‍ॅड. नितीन झंजाड यांनी काम पाहिले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड