शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

देश ‘सहिष्णू’ नव्हे; ‘असहिष्णूच’!, ज्येष्ठ दिग्दशिका सई परांजपे यांनी मांडले परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 04:59 IST

Sai Paranjape : सई परांजपे यांचे ‘सय’ हे मराठीतील आत्मचरित्र ‘अ पॅचवर्क क्विल्ट : अ कोलाज ऑफ माय क्रिएटिव्ह लाईफ’ या नावाने उपलब्ध झाले आहे.

पुणे : आजच्या काळात ‘ग्लोबल इंडिया’ ही संकल्पना नाकारली जात आहे. आपण एकता, बंधुता, एक देश-एक राष्ट्र या सर्वांचाच अर्थ विसरून चाललो आहेत. या संकल्पनेचा व्यापक विचार न करता संकुचित विचासरणीकडे झुकत आहोत. कितीही सहिष्णू आहोत असे भासवले जात असले तरी, प्रत्यक्षात देश असहिष्णू झाला आहे. सध्या देशात जे काही सुरू आहे ते न पटणारे आहे, असे परखड मत ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांनी व्यक्त केले.सई परांजपे यांचे ‘सय’ हे मराठीतील आत्मचरित्र ‘अ पॅचवर्क क्विल्ट : अ कोलाज ऑफ माय क्रिएटिव्ह लाईफ’ या नावाने उपलब्ध झाले आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने या पुस्तकावर ऑनलाइन संवाद कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. नाटक, दूरदर्शन, चित्रपट अशा माध्यमांमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाऱ्या सई परांजपे यांच्याशी लतिका पाडगावकर यांनी संवाद साधला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार कुमार केतकर, उपेंद्र दीक्षित, डॉ. विद्या केळकर, ज्येष्ठ पत्रकार अभय वैद्य उपस्थित होते.सई परांजपे यांचे वडील रशियन आणि आई शकुंतला मराठी. धर्मनिरपेक्षता, स्वतंत्र विचारसरणी अशा सर्वार्थानेच या कुटुंबाला एक ‘ग्लोबल’ ओळख मिळाली. अशा कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सई परांजपे यांना ही संकल्पना आज देशातून नाकारली जात आहे का? असे विचारले असता त्यांनी याचे उत्तर ‘दुर्दैवाने, हो’ असे दिले.

दिल मांगे मोअर...सई परांजपे यांनी चित्रपट व्यवसायातील पुरुषी वर्चस्वाला छेद देत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ८१ वर्षांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला त्यांचा हा कलात्मक प्रवास शंभरीपर्यंत जावो हीच सदिच्छा आहे. लोकांना त्यांनी कलात्मक प्रवासात खूप भरभरून दिले आहे. पण ‘दिल मांगे मोअर’! अशी मिस्कील टिपण्णी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केली.

टॅग्स :Puneपुणे