शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे देशाच्या सहिष्णुतेला गालबोट : डॉ. शमसुद्दीन तांबोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 20:14 IST

सध्या सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या विकृती बाहेर काढण्याची गरज आहे. सामाजिक सलोखा हा देशाचा मूलभूत आधार आहे.

ठळक मुद्देतीन गरीब विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकार

पुणे : जम्मू येथे एका मुलीचे अपहरण केले जाते,तिच्यावर अत्याचार केले जातात आणि तिला मारले जाते. समाजात घडणाऱ्या याप्रकारच्या सातत्यपूर्ण घटना माणुसकीला पोषक नाही. अशा प्रसंगांमुळे समाजामध्ये दुरावा निर्माण होतानाच देशाच्या सहिष्णुतेला गालबोट लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत माणसाने समोरच्या व्यक्तीचा जात, धर्म न पाहता माणूस म्हणून विचार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे असे प्रसंग घडू नये यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे, असे मत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केले. गणेश पेठेतील श्री पोटसुळ्या मारुती मंडळातर्फे तीन गरीब आणि हुशार विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. यावेळी इकबाल दरबार, पोटसुळ्या मारुती मंडळाचे कुणाल पवार, ओंकार जाधव, राजेंद्र मांढरे, समीर तिडके, प्रयाग जाधव, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयुष शहा, अभिषेक मारणे, चेतन शिवले, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला नवले, पर्यवेक्षिका कल्पना कोल्हे, शिक्षक जनार्दन इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमात तायरा शेख, आयशा शेख, आचल कांबळे या विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व मंडळाने स्वीकारले असून मंडळातर्फे साडेचार हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच पुस्तके, वह्या, गणवेश, दप्तर, बूट या शालेय वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. तांबोळी म्हणाले, मुलींवरील अत्याचाराचे दुर्देवी प्रसंग गुजरात आणि उत्तरप्रदेश येथे देखील घडले. या सगळ्या प्रकारामधून समाजात वाढत चाललेली विकृती दिसून येते. सध्या सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या विकृती बाहेर काढण्याची गरज आहे. प्रत्यक्षात सामाजिक सलोखा हा देशाचा मूलभूत आधार आहे.’

  

टॅग्स :Puneपुणे