पुणे : जिल्ह्यात १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीकरिता २ डिसेंबर आणि शनिवारी (दि. २०) मतदानप्रक्रिया पार पडली. आता या निवडणुकीकरिता रविवारी (दि. २१) सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. बारामती नगर परिषदेसाठी २० टेबल व मतमोजणीच्या ६ फेऱ्या होणार आहेत. तर सर्वाधिक १० फेऱ्या आळंदी नगर परिषदेसाठी असतील.
जिल्ह्यातील १२ नगर परिषदा आणि ३ नगर पंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान झाले. तर न्यायालयीन प्रक्रियेनंतर राज्य निवडणूक आयोगाने बारामती व फुरसुंगी उरुळी देवाची या दोन नगर परिषदा आणि ३ नगर परिषदांमधील १० वॉर्डांची निवडणूक शनिवारी (दि. २०) झाली. या सर्व ठिकाणी रविवारी (दि.२१) मतमोजणी होत आहे. त्यासाठी राखीव कर्मचारी मिळून एकूण ९१४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकालाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात असून त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत.
प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून मतमोजणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आवश्यक साहित्य उपलब्ध व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रात प्रवेशाकरिता संबंधित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशिकाही देण्यात आलेल्या आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना फेरीनिहाय निकाल तातडीने उपलब्ध करून देण्याकरिता मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र बैठक व्यवस्था (माध्यम कक्ष) तयार करण्यात आले आहेत.
संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेऊन अचूक व सुयोग्य पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याकरिता काटेकोर नियोजन व रंगीत तालीम घेण्याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला आहे, अशी माहिती डुडी यांनी दिली.
नगर परिषद, पंचायत--टेबल -- फेऱ्या
बारामती--२०--६
लोणावळा--१३--८
दौंड--१४--५
तळेगाव दाभाडे--१४-६
चाकण--१२--५
जुन्नर--१०--३
आळंदी--५--१०
शिरूर--१२--४
सासवड--११-४
जेजुरी--१०--२
भोर--५--५
इंदापूर--१०--३
राजगुरुनगर--१०--५
वडगाव--७--४
माळेगाव--१७--१
मंचर--१०--३
फुरसुंगी उरुळी देवाची--१६--८
Web Summary : Pune district's local body election counting begins tomorrow at 10 AM. The district administration is prepared, with 914 personnel deployed. Baramati has 20 tables and 6 rounds; Alandi has the most, with 10 rounds. Security is heightened to maintain order.
Web Summary : पुणे जिले में स्थानीय निकाय चुनाव की मतगणना कल सुबह 10 बजे शुरू होगी। जिला प्रशासन तैयार है, 914 कर्मचारी तैनात किए गए हैं। बारामती में 20 टेबल और 6 दौर हैं; आलंदी में सबसे अधिक 10 दौर हैं। व्यवस्था बनाए रखने के लिए सुरक्षा कड़ी।