शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणीचा वाचविला जीव, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केले समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:43 IST

आर्मी कॉलनी येथे राहणारी एक २९ वर्षाची तरुणी मुंबईमध्ये नोकरी करत होती.

पुणे : प्रियकर लग्न करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नैराश्याने घेरलेल्या व आत्महत्या करण्याच्या तयारीने घरात स्वत:ला कोंडून घेतल्या तरुणीला महिला पोलीस अधिकाऱ्यांनी समुपदेशन करुन तिचा जीव वाचविला. हा प्रकार हडपसर भागातील आर्मी कॉलनीत सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला.

याबाबतची माहिती अशी, आर्मी कॉलनी येथे राहणारी एक २९ वर्षाची तरुणी मुंबईमध्ये नोकरी करत होती. तेथे तिचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. वर्ष, दोन वर्षे ते एकत्र होते. त्यानंतर तिने लग्नाबाबत विचारल्यावर त्याने मी पुण्याला येऊन तुझ्या आईवडिलांची भेट घेऊन मागणी घालतो, असे सांगितले. मात्र, त्यानंतर तो टाळाटाळ करु लागला. त्यामुळे निराश झालेल्या या तरुणीने नोकरी सोडली. ती पुण्यात आली. ती या तरुणाशी संपर्क साधून पुण्याला कधी येतो, याची विचारणा करत असे़ मात्र, तो आज उद्या करु लागला. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या या तरुणीने सोमवारी सकाळी स्वत:ला घरातील खोलीत कोंडून घेतले. घरातील लोकांनी दरवाजावाजवूनही तिने उघडला नाही. शेवटी त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. त्याबरोबर सकाळी साडेअकरा वाजता हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा बांम्बे व त्यांचे सहकारी तातडीने तेथे पोहचले. ही तरुणी कोणाचेच ऐकत नव्हती. तेव्हा वर्षा बाम्बे या पुढे झाल्या. त्यांनी दरवाजाच्या बाहेरुनच त्या तरुणीला बोलते केले.

तिच्याशी त्या बोलू लागल्या. पोलीस अधिकारी आपल्याशी बोलत असल्याचे समजल्यावर ही तरुणीही थोडी भानावर आली. तिने दरवाजा उघडला. पोलिसांनी खोलीत जाऊन पाहिले तर या तरुणीने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहिली होती. त्यानंतर या तरुणीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिची सर्व हकीकत जाणून घेतल्यानंतर तिला समजावून सांगण्यात आले. त्यानंतर ही तरुणी शांत झाली वतिने आपण आता असा अविचार करणार नसल्याचे सांगितले. पोलिसांनी केलेल्या समुपदेशनामुळे आपली मुलीचा आत्महत्येचा विचार बदलल्याचे पाहून तिचे आईवडिल व भावाने पोलिसांचे आभार मानल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी सांगतले.

टॅग्स :Puneपुणे