शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांना कानपिचक्या - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 02:29 IST

शहरातील मंडईतील मूळ जागामालकांनाच गाळे दिले पाहिजेत, शहरातील गणेश मंडईच्या जागा वाटपातही गडबड करण्याचा प्रयत्न झाल्याचे माझ्या कानावर आले आहे. हे खोटे असेल तर दुधात साखर, अन्यथा मी ते नीट करणार. मला ते चालणार नाही.

बारामती - शहरातील मंडईतील मूळ जागामालकांनाच गाळे दिले पाहिजेत, शहरातील गणेश मंडईच्या जागा वाटपातही गडबड करण्याचा प्रयत्न झाल्याचे माझ्या कानावर आले आहे. हे खोटे असेल तर दुधात साखर, अन्यथा मी ते नीट करणार. मला ते चालणार नाही. आपण बारामतीमध्ये टिकलो ते केवळ आपण दिलेला शब्द पाळतो म्हणूनच. शब्दाचे पक्के असल्याने आज आपण या स्थानावर आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या. चुकीचे वागाल तर राजीनामा घेण्याचा सज्जड दमदेखील पवार यांनी या वेळी दिला.बारामती येथे जाहीर सत्कार व पक्षाच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी पवार यांनी नगरसेवकांना चांगलेच सुनावले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी गेल्या काही महिन्यांपासून सतत रजेवर जात आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी या वेळी नगरसेवकांना दिलेल्या कानपिचक्यांची चांगलीच चर्चा रंगली. पवार म्हणाले, काही अधिकारी, कर्मचारी फोन करून मला सांगतात, मला रजेवर जावे लागतंय. आम्हाला काम करूदिले देत नाही. आम्हाला योग्य वागणूक दिली जात नाही, हे चांगले नाही. आपण कडक वागतो. मात्र, काम करून घेण्याची हातोटी असते. तुम्ही समजुतीने काम करून घ्यायला शिका.अधिकाºयांशी अडेलतट्टूपणाने वागाल, ते मी खपवून घेणार नाही. अलीकडे घरगडी कोणाचे ऐकत नाही. मग तुम्ही त्यांच्याशी घरगड्याप्रमाणे वागाल तर कसे चालेल, नगरपालिकेच्या सर्वांनी याची नोंद घ्यावी. सर्वांना समजून सांगण्याची आपली भूमिका आहे.पुरुष नगरसेवकांनी महिला नगरसेवकांशी नीट बोलावे, आदराने बोलावे. काही जण वेगळ्या पद्धतीने गटबाजी करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने वागतात, असे काही महिला नगरसेवक फोन करून सांगतात. गटबाजी करण्याचा, स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या भानगडीत पडू नका, मी हे सहन करणार नाही. सगळे राष्ट्रवादीचेच आहेत. गटबाजी चालणार नाही, हे नम्रतेने नमूद करू इच्छितो. गणेश मंडईतील गाळे चुकीच्या व्यक्तींना दिले असल्यास चालून घेणार नाही, असेही त्यांनी सुनावले.दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका...नगरसेवकांना मला भेटायचे असेल तर निवेदनावर सह्या करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. माझ्यावर दबाव आणण्यासाठी सह्या करणारांना अजित पवार राजकारणात असेपर्यंत एकही पद मिळणार नाही. कोणतीही दादागिरी सहन केली जाणार नाही.उपनगराध्यक्ष पद मिळविण्यासाठी नगरसेवकांनी सह्यांची मोहीम राबविली आहे. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, दबाव आणणाºया नगरसेवकांचे राजीनामे घेऊ, नवे नगरसेवक निवडून आणू, हे लक्षात ठेवा, असे पवार यांनी नगरसेवकांना ठणकावले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस