शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

पुण्यातील कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 12:20 IST

पुण्यातील कॉसमॉस बँकेवर झालेल्या हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तपास अहवालात हे उघड झालं आहे.

ठळक मुद्देपुण्यातील कॉसमॉस बँकेवर गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तपास अहवालात हे उघड झालं आहे. कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यानंतर सात महिन्यांनी हा अहवाल आला आहे.

पुणे - पुण्यातील कॉसमॉस बँकेवर गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तपास अहवालात हे उघड झालं आहे. कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला अतिशय प्रगत, पूर्वनियोजित, योग्य समन्वय असलेला होता. ज्यामध्ये बचावाचे तीन मुख्य स्तर भेदण्यात आले असे अहवालात म्हटले आहे. कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यानंतर सात महिन्यांनी हा अहवाल आला आहे.

कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा दरोडा घातल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात १७०० पानी दोषारोपपत्र दाखल केले होते. सायबर गुन्हे शाखेकडून विशेष न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. ११ व १३ ऑगस्ट रोजी कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरसारख्या पॉक्सी सर्व्हरद्वारे जगभरातील २८ देशांतून तसेच भारतातील विविध शहरांमधून क्लोन केलेल्या व्हिसा कार्ड व रुपे कार्डद्वारे ९४ कोटी ४२ लाख रुपये काढून दरोडा घालण्यात आला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते़ या तपास पथकाने कोल्हापूर येथे तपास केल्यावर या गुन्ह्यातील एटीएममधून पैसे काढणाऱ्यांचा छडा लागला होता.

कॉसमॉस बँक सायबर दरोडाप्रकरणी १७०० पानांचे दोषारोपपत्र

पुणे पोलिसांनी याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी ९ आरोपींविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात १७०० पानी दोषारोपपत्र दाखल केले होते. सायबर गुन्हे शाखेकडून विशेष न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. फहिम मेहफूज शेख  याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर फहिम अझीम खान, शेख मोहम्मद अब्दुल जब्बार, महेश साहेबराव राठोड, मोहम्मद सईद इक्बाल हुसेन जाफरी उर्फ अली, युस्टेस अगस्टीन वाझ उर्फ अँथनी, रफिक जलाल अन्सारी, अब्दुल्ला अफसर अली शेख यांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून त्यांनी कोल्हापूर व अजमेर येथून पैसे काढले होते.

अजमेरमधून पैसे काढणारे दोघे अटकेत : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपये लुटल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या एसआयटीने मुंब्रा येथील दोघांना अटक केली होती. दोघांनाही अजमेर येथून १० बनावट एटीएम कार्डच्या माध्यमातून ७ लाख ५० हजार रुपये काढल्याचे तपासात समोर आले होते. रफिक जलाल अन्सारी (३४), अब्दूल्ला अफसर अली शेख (२८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं होती. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सुहास गोखले यांनी यासंदर्भात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अटक केलेले दोघेही मीरा रोड येथे एका गॅरेजमध्ये दुचाकी रिपेअरींगचे काम करतात. त्यांनी हल्ल्याच्या दिवशी त्यांनी अजमेर येथील एटीएममधून १० एटीएम कार्डच्या मदतीने साडेसात लाख रुपयांची रोकड काढली. बँकेच्या सर्व्हरवर हल्ला करून ११ त १३ ऑगस्ट दरम्यान ९४ कोटी ४२ लाखांची रोकड वेगवेगळ्या मार्गांनी काढण्यात आली होती. त्यापैकी ४१३ बनावट डेबीट कार्डच्या माध्यमातून २ हजार ८०० व्यवहार करून अडीच कोटीची रोकड देशातील विविध एटीएम केंद्रातून काढण्यात आली होती. तर १२ हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे करण्यात आले होते. या गुन्हयाचा तपासासाठी सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. मुंबई, इंदुर, कोल्हापूर, अजमेर येथील एटीएम केंद्रात मिळालेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात आले होते. चित्रीकरणाद्वारे आरोपींचा माग काढण्यात येत होता. यापुर्वी अशाच प्रकारे कोल्हापूर, मुंबईतून पैसे काढणा-या सात जणांना सायबर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी दोघांना मीरा रोड येथून अटक करण्यात आली होती.   

टॅग्स :Puneपुणेbankबँक