शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कॉसमॉस बँक सायबर दरोडा प्रकरणात आणखी दोघांना मुंबईतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 00:16 IST

कॉसमॉस बँकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबविल्याप्रकरणी विरार आणि भिवंडी येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे.

पुणे : कॉसमॉस बँकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबविल्याप्रकरणी विरार आणि भिवंडी येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एच. जाधव यांनी हा आदेश दिला आहे.नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय ३४, साईकृपा अर्पामेंट, नारंगी रस्ता, विरार, मूळ कुलीना टुकुरा, जि. बरगर, ओडिशा) आणि मोहंमद सईद इक्बाल हुसेन जाफरी ऊर्फ अली (वय ३०, रा. हमालवाडा, दर्गा रस्ता, भिवंडी) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे. त्यामुळे आता एकूण अटक आरोपींची संस्था ६ झाली आहे.यापूर्वी शेख मोहंमद अब्दुल जब्बार (वय २८, मिर्झा कॉलनी, औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय २२, धावरीतांडा, नांदेड), फहिम मेहफूज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्पलेक्स, भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय ३०, रा. सीमा हॉस्पिटलच्या मागे, आझादनगर औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. तर, आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जब्बार आणि रोठोड यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराणा आणि जाफरी यांना अटक करण्यात आली आहे.मुंबई, इंदूर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची छायाचित्रे तयारकरण्यात आली. मोबाईलची माहिती आणि आरोपींच्या फोटोंवरून ते भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा आणि विरार येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे.पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अ‍ॅड. चैत्राली पणशीकर यांनी केली होती.कोल्हापुरात एकत्र आले आरोपीबँकेचे सर्व्हर हॅक होणार असल्याची माहिती मिळाल्याने विविध भागांतील सर्व आरोपी कोल्हापूर येथे आले. त्यांनी पैसे काढण्यासाठी ९५ क्लोन एटीएम कार्डचा वापर केला आहे. या प्रकरणी सुहास सुभाष गोखले (वय ५३, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटूल्याची घटना ११ ते १३ आॅगस्टदरम्यान झाली होती. यातील अडीच कोटी रुपयांची रक्कम भारतातील विविध एटीएम केंद्रांतून काढण्यात आली आहेत. यात ४१३ बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून २ हजार ८४९ व्यवहार करण्यात आले आहेत. तर, १२ हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे झाले असून, त्यातून ७८ कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून १३ कोटी ९२ लाख रुपये बँकेतून गेले आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमBanking Sectorबँकिंग क्षेत्र