बारामती : जगद्गुरू तुकाराममहाराज व संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तालुक्यातील पालखीमार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे.याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता मिलिंद बारभाई यांनी दिली. जगदगुरू तुकाराम महाराज व संत सोपानकाकांची पालखी बारामती तालुक्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. यादरम्यान तुकाराम महाराजांची पालखी तालुक्यातून ३२ किलोमीटर अंतर मार्गक्रमण करते, तर संत सोपानकाकांची पालखी तालुक्यातून ६० किलोमीटर अंतर मार्गक्रमणकरते. या पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना व त्यांच्या वाहनांना कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गाच्या डागडुजीची तयारी जोरदार सुरू आहे.
पालखीमार्गाची दुरुस्ती सुरू
By admin | Updated: July 7, 2015 03:07 IST