शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

नगरसेवक शिळीमकरांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: January 18, 2015 01:18 IST

बेकायदेशीरपणे दुकान पाडून नुकसान केल्याप्रकरणी बिबवेवाडीतील नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : बेकायदेशीरपणे दुकान पाडून नुकसान केल्याप्रकरणी बिबवेवाडीतील नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने दिलेल्या अर्जावरून पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र आबा शिळीमकर, सतीश नाना मोरे, मनोज सतीश मोरे, श्रीपाल राजेंद्र शहा, महेश यशवंत शिळीमकर, जयंत गुंदेशा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रभाकर महादू वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे यांचे कात्रज येथील मोकळ्या जागेमध्ये दुकान होते. ही जागा मूळची सतीश मोरे यांच्या मालकीची आहे. या जागेचा विकसन करारनामा (डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट) केले होते. त्यांच्या मध्ये ठरलेल्या मुदतीत या जागेवर बांधकाम न झाल्यामुळे त्याने शहा, शिळीमकर यांना जागा विकली. त्यांच्यामध्ये जागेचा व्यवहार झाल्यानंतर वाघमारे यांच्याशी जागा सोडण्यासंदर्भात बोलणी सुरू असतानाच १२ डिसेंबर २०१४ रोजी शहा यांनी जेसीबीच्या साह्याने वाघमारे यांचे दुकान पाडले. या दुकानामधील स्टेशनरी, बांगड्या आदी साहित्य मिळून पाच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार वाघमारे यांनी दिली होती. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी कलम ४४७ नुसार गुन्हा दाखल केला होता. आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा तक्रारी अर्जही त्यांनी दिला होता. त्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावले आहे. (प्रतिनिधी)