शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

मिळकतकर धारकांच्या 'विमा कवचा' ला कोणतीही अडचण नसल्याचा पुणे महापालिकेचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 16:08 IST

पुणे महापालिका प्रशासनाने, नियमित व वेळेवर मिळकत कर भरणाऱ्यांसाठी अपघाती विम्याचे ५ लाख रूपयांचे विमा कवच व कुटुंबियांना अन्य विमा सवलती देऊ केल्या होत्या.

ठळक मुद्दे नवीन विमा कंपनी नियुक्त न झाल्याने विमा लाभ मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण

पुणे : महापालिकेचा नियमित व वेळेवर मिळकत कर भरणाऱ्या मिळकतकर धारकांना लागू केलेल्या विमा कवचास कुठलीही अडचण नसल्याचा दावा पुणे महापालिका प्रशासनाने केला आहे. तांत्रिक कारणास्तव नवीन निविदा रद्द झाली असली तरी, मागील वर्षी ज्या कंपनीला विम्याचे काम देण्यात आले होते, त्याच कंपनीला पुढील कंपनीची नियुक्ती होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.      मिळकत कराचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने पुणे महापालिका प्रशासनाने, नियमित व वेळेवर मिळकत कर भरणाऱ्यांसाठी अपघाती विम्याचे ५ लाख रूपयांचे विमा कवच व कुटुंबियांना अन्य विमा सवलती देऊ केल्या होत्या. मात्र २७ मे रोजी पूर्वीच्या विमा कंपनीची मुदत संपल्याने नवीन विमा कंपनी नियुक्त न झाल्याने मिळकतधारकांना विमा लाभ मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.     दरम्यान पंडीत दिनदयाळ विमा योजनेसाठी काढलेल्या निविदेला दोन विमा कंपन्यांनी प्रतिसाद दिला असताना, त्यापैकी एक कंपनी अपात्र ठरली आहे. तर दुसºया कंपनीचे ब पाकीट उघडलेले नाही. यात तांत्रिक कारणास्तव ही निविदा रद्द करण्यात आली असली तरी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर  मागीलवर्षी विम्याचे काम ज्या कंपनीला दिले आहे, ती सरकारी विमा कंपनी असून, या कंपनीने २७ मे पासून एक्स्टेंशन देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.    

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकर