शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पोलिसांची साप्ताहिक बैठक होणार प्रथमच व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 23:43 IST

मंगळवारी होणारी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची बैठक (टीआरएम) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता ही टीआरएम बैठक होणार आहे. त्याबाबतच्या सर्व सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सर्व अधिका-यांना दिल्या आहेत. 

पुणे : कोरोना वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन शासन तसेच पोलिसांकडून होत आहे़ त्याची अंमलबजावणी आता पोलिसांनीही सुरु केली आहे. येत्या मंगळवारी होणारी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची बैठक (टीआरएम) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता ही टीआरएम बैठक होणार आहे. त्याबाबतच्या सर्व सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सर्व अधिका-यांना दिल्या आहेत. मंगळवारी सकाळी होणा-या टीआरएम बैठकीसाठी पोलीस आयुक्तालयातून सर्व वरिष्ठ अधिका-यांना एक लिंक पाठविण्यात आली आहे. ती त्यांनी डाऊन लोड करुन घेतली आहे़ त्याद्वारे ते आपल्या कार्यालयात बसून थेट पोलीस आयुक्तालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधणार आहे. सोमवारी रात्री सर्व वरिष्ठ अधिकाºयांनी आपल्या कार्यालयात बसून या व्हिडिओ कॉन्फरन्सची चाचणी घेतली.पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दर मंगळवारची साप्ताहिक बैठक सुरु केली.  ती टीआरएम या नावाने ओळखली जाते. या बैठकीत शहरातील सर्व गुन्ह्यांचा आढावा घेतला जातो. चांगले काम करणा-यांचे कौतुक केले जाते तसेच ज्यांची कामगिरी चांगली नाही त्यांची कानउघडणीही केली जाते. या टीआरएम ची सर्वच अधिकाºयांना चांगलीच धास्ती असते. ही बैठक आजपर्यंत कधीही रद्द झालेली नाही. जर मंगळवारी एखादा मोठा कार्यक्रम असेल (राष्ट्रपती दौरा) तर ती बैठक दुसºया दिवशी घेतली जाते़ या बैठकीमुळे पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखांच्या कामगिरीत चांगली वाढ झाली असून त्यात सातत्य राहिले आहे. त्यामुळे या बैठकीला शहर पोलीस दलात विशेष महत्व दिले जाते. ती प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना