शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Vaccine : उत्स्फूर्त प्रतिसाद ! ससून रुग्णालयामध्ये होणाऱ्या चाचणीसाठी ६०० हून अधिक स्वयंसेवकांची नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 21:05 IST

ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीकडून ‘कोविशिल्ड’ ही लस विकसित करण्यात आली आहे...

ठळक मुद्देआरोग्यविषयक तपासण्या व रक्ताचे नमुने तपासणी करून लस दिली जाणारलस दिलेल्या स्वयंसेवकांचा पुढील सहा महिने पाठपुरावा केला जाणार

पुणे : ससून रुग्णालयामध्ये होणाऱ्या ‘कोविशिल्ड’ या कोरोनावरील लसीच्या चाचणीसाठी सुमारे ६०० स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी सात जणांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर मंगळवारी (दि. २२) पात्र स्वयंसेवकांना लसीचा डोस दिला जाईल, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली.ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीकडून ‘कोविशिल्ड’ ही लस विकसित करण्यात आली आहे. या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या भारती रुग्णालय व केईएम रुग्णालयाच्या संशोधन केंद्रांत सुरू झाली आहे. तर ससून रुग्णालयामध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या प्रक्रियेला सोमवार (दि. २१) पासून सुरू झाली आहे. या चाचणीसाठी सुमारे ६०० स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. रुग्णालयाकडून त्यासाठी आवाहन करण्यात आले होते. दुरध्वनीद्वारे ही नोंदणी सुरू असून अजूनही स्वयंसेवकांकडून नोंदणीसाठी संपर्क साधला जात आहे. ससूनमध्ये १५० ते २०० जणांना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.‘नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांपैकी दररोज ८ ते १० जणांनाच दररोज बोलाविले जाणार आहे. त्यांच्या आरोग्यविषयक तपासण्या व रक्ताचे नमुने तपासणी करून लस दिली जाणार आहे. पण नोंदणी केलेल्या सर्वांनाच बोलाविले जाईल असे नाही. सोमवारी आठ जणांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी सात जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये कोविड व अँटीबॉडी चाचणीही असेल. मंगळवारी सकाळी त्याचे अहवाल आल्यानंतर पात्र ठरलेल्यांना लसीचा डोस दिला जाईल. पुढील महिनाभर १५० ते २०० जणांना लस देण्याची ही प्रक्रिया सुरू राहील. लस दिलेल्या स्वयंसेवकांचा पुढील सहा महिने पाठपुरावा केला जाणार आहे,’ असे डॉ. तांबे यांनी सांगितले.-------------नोंदणी केवळ दुरध्वनीवरूनचस्वयंसेवकांची नोंदणी केवळ दुरध्वनीवरूनच केली जात आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. तसेच तपासणीसाठीही स्वयंसेवकांची निवड केल्यानंतर त्यांना रुग्णालयात बोलावून घेतले जाणार आहे. त्यामुळे थेट रुग्णालयात येऊ नये, असे आवाहन डॉ. मुरलीधर तांबे यांनी केले आहे.-----------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याsasoon hospitalससून हॉस्पिटल