शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Pune Updates: पुण्यात रात्री आठ ते सकाळी सात दरम्यान जमावबंदी; पालिका आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 00:27 IST

हॉटेल, सिनेमागृहे, बार-रेस्टॉरंट आदी सार्वजनिक ठिकाणे आठ वाजता होणार बंद 

पुणे : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यासोबतच पालिका हद्दीतील सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फुडकोर्ट, सिनेमागृहे, नाट्यगृह, प्रेक्षागृह सुद्धा रात्री आठ वाजता बंद करावी लागणार आहेत. सेवा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणांवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

याबाबतचे आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. या आदेशामधून अत्यावश्यक सेवांना मात्र वगळण्यात आले आहे. राज्य शासनापाठोपाठ महापालिकेने काढलेले आदेश २७ मार्च (शनिवार) मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या आदेशाची रविवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या आदेशानुसार, सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा संमेलने यांस संपूर्णत: प्रतिबंध करण्यात आला आहे. भूमी पूजन, उदघाटन समारंभ व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे.  नाट्यगृह / प्रेक्षागृह या ठिकाणी देखील अशा प्रकारचे कार्यक्रम घेता येणार नाहीत.  दुकानामध्ये एकावेळेस ५ पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश देणार नाहीत.

सर्व खाजगी कार्यालये (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) ५० टक्के मनुष्यबळासह सुरु ठेवता येतील. तसेच शासकीय / निमशासकीय कार्यालयांबाबत कार्यालय प्रमुखांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. उत्पादन क्षेत्र संपूर्ण क्षमतेने सुरु ठेवता येणार असले तरी कामाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक आहे.  कर्मचाऱ्यांची उपस्थिती, वेळेचे नियोजन आणि सुरक्षा साधने याचे नियोजन करणे आवश्यक आहे. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे असलेल्या नागरिकांना / कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. शासकीय कार्यालातील गर्दी टाळण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयात नागरिकांना (निर्वासित सदस्य, पदाधिकारी वगळून) अत्यावश्यक काम वगळता कार्यालयात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बैठकीकरीता निमंत्रित केलेल्या नागरिकांना संबंधित विभाग अथवा  कार्यालय प्रमुख यांच्याकडून प्रवेश पत्र दिले जाणार आहे.सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणची जागेची उपलब्धता पाहून सुरक्षित अंतर पाळण्याच्या अनुषंगाने किती नागरिकांना प्रवेश देता येईल याची निश्चिती व्यवस्थापन / ट्रस्ट यांना करावी लागणार आहे. शक्यतो ऑनलाईन पासची व्यवस्था करण्यात यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.* सार्वजिक वाहतूक व्यवस्था (पीएमपीएमएल) ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे.* लग्न समारंभ कार्यत्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.* अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रमाळा जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थिती असावी.* पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व उद्याने सकाळी ७ ते सकाळी १० या वेळेतच सुरु राहतील.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्यास पुन्हा सुरुवात केली जाणार आहे.  गृह विलगिकरणाबाबतची सर्व माहिती नागरीकांनी सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी यांना देणे बंधनकारक आहे. तसेच वैद्यकीय उपचारांबाबत माहिती देणे आवश्यक आहे. पॉझिटिव्ह झाल्यापासून १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी पाळला जातो आहे की नाही याची खबरदारी घ्यायची आहे.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णांना तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस