शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Pune :दिल्लीहून खास विमानाने गुरुवारी पुणे जिल्ह्यासाठी आले फक्त ३५०० रेमडेसिविर इंजेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 15:13 IST

पुणे जिल्ह्यात मागणी वाढत असताना ३५०० रेमडेसिविरचा हा पुरवठा पुरणार का..?

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. याचवेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना रेमडेसिविरसाठी वणवण फिरावे लागत आहे. दिल्ली येथून थेट विशेष फ्लाईटने पुण्यात गुरुवारी दुपारी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा आला. पण त्याची संख्या फक्त ३५०० इतकी आहे. त्यामुळे हा रेमडेसिविरची सध्याची मागणी पाहता आज मिळालेला साठा पुरेसा ठरणारा नाही. मात्र, आज रात्री आणखी रेमडेसिविरचा साठा पुण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे. 

शहरात बुधवारी दिवसभर रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड वणवण करावी लागली.दरम्यान, पुण्यासाठी रेमडेसिविर उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन सतत प्रयत्नशील असून रात्री उशिरापर्यंत दिल्ली येथून थेट विशेष फ्लाईटने काही प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुण्यात येणार होता. मात्र तो आज दुपारी दाखल झाला.  

पुणे शहर आणि जिल्ह्यात सोमवार,मंगळवार या दोन दिवसांत १२ हजार ७९७ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. परंतु, दररोज रुग्णसंख्या  वाढतच असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी देखील वाढतच आहे. सध्या अनेक खासगी हाॅस्पिटलकडून गरजेपेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शन वापर अधिक केला जात असून, यावर जिल्हा प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. राज्याच्या तुलनेत गेले दोन दिवस पुणे जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा बऱ्यापैकी पुरवठा होत असताना बुधवारी सायंकाळपर्यंत मात्र पुण्यासाठी एकही रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा झाला नव्हता. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, पुण्याला रेमडेसिविरचा जास्तीत जास्त पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत. दिल्लीतून वैयक्तिक प्रयत्नानांनी हे डोस मिळवले आहेत.आता शासकीय पातळीवरून मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच आज रात्री नेमके किती डोस उपलब्ध होतील याचा अंदाज नाही. 

-----कोरोनामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले नाही म्हणून आता पर्यंत एकाही रुग्णांचा मृत्यु झाला नाही, पण रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे काही करून दोन तरी रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून द्या, अन्यथा तुमच्या पेशंटची जबाबदारी आम्ही घेणार नाही, असे सांगून सध्या काही हाॅस्पिटल  पेशंटच्या जिवाशी खेळत आहेत. तसेच काही हाॅस्पिटलकडून गरजेपेक्षा अधिक प्रमाणात पेशंटला रेमडेसिविर इंजेक्शनचा डोस दिला जात असल्याचे भरारी पथकातील एका अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीairplaneविमानcollectorजिल्हाधिकारी