शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

Coronavirus Pune: पुणे जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट गावांची संख्या दुप्पट: तब्बल ३०८ गावं हॉटस्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 17:45 IST

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात हाॅटस्पाॅट गावांची संख्या १४४ एवढी होती.

पुणे : गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असून,  हाॅटस्पाॅट गावांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात हाॅटस्पाॅट गावांची संख्या १४४ एवढी होती. परंतु कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ही संख्या वेगाने वाढत असून, हॉटस्पॉट गावांची संख्या दुपटीने वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना हॉटस्पॉट गावांची संख्या तब्बल 308 झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेत दोन प्रकारची गावे दिसत आहेत. हाॅटस्पाॅट गावांची संख्या वाढ असताना तब्बल 444 गावांमध्ये आजही एकही कोरोना बाधित रुग्ण नाही.  जिल्ह्यात आज 308 गावे कोरोना हॉटस्पॉट बनली आहे. त्यामध्ये शिरूर, जुन्नर, हवेली, दौंड, इंदापूर तालुक्‍यात सर्वाधित हॉस्पॉट गावे आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 20 सप्टेंबर 2020 मध्ये सर्वाधिक 144 हॉटस्पॉट गावांची नोंद झाली. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्गाचा वेग मंदावला. त्यामुळे अनेक नियम शिथिल झाली. मात्र, फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोनाने पुन्हा डोक वर काढले आणि अवघ्या महिन्याभरात 10 मार्च रोजी ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांची संख्या 41 वर पोहचली. मार्चअखेर ही संख्या 131 इतकी होती. तर 14 एप्रिल रोजी यामध्ये दुप्पट वाढ होवून 308 वर पोहचली आहे. सुरुवातीला हवेली, शिरूर, इंदापूर, बारामती आणि खेड या तालुक्‍यांमध्ये बाधित सापडण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, वेल्हा तालुका सोडला तर अन्य सर्व तालुक्‍यांमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, मार्च अखेरनंतर वेल्हे तालुक्‍यातही बाधित सापडू लागल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. -----तालुका कंटेन्मेंट झोन संख्या                  20 सप्टेंबर 2020                            14 एप्रिल 2021 

आंबेगाव -           23                                             28 बारामती -           10                                             28 भोर -                  0                                               4 दौंड -                 5                                               30 हवेली -              11                                             30 इंदापूर -             17                                            30 जुन्नर -               26                                            35 खेड                  10                                            25 मावळ -             11                                             9 मुळशी -             1                                             18 पुरंदर -               6                                             29 शिरूर -             21                                           40 वेल्हा -               3                                            2

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी