शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा १२५ कोटींचा हिशेब मागताच सत्ताधारी भाजपाकडून पुणे पालिकेची सभा तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 07:13 IST

तीन महिन्यांत पालिकेची मुख्य सभाच झाली नव्हती. त्यामुळे अनेक नगरसेवकांचे पद धोक्यात आले होते.

पुणे : महापालिकेची मुख्य सभा विरोधी पक्षांच्या आक्रमकतेने सुरू झाली. ‘कोरोना’वर केलेल्या १२५ कोटींच्या खर्चाचा हिशेब विरोधी पक्षांनी मागताच बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी सभा तहकूब केली.तीन महिन्यांत पालिकेची मुख्य सभाच झाली नव्हती. त्यामुळे अनेक नगरसेवकांचे पद धोक्यात आले होते. त्यांची हजेरी लावून घेण्याकरिता बोलावलेल्या या मुख्य सभेला जवळपास १०० नगरसेवक उपस्थित होते. सभेला सुरुवात होताच काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे व नगरसेवक दिलीप बराटे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. कोरोनावर आतापर्यंत किती खर्च झाला, प्रशासन नेमके काय करीत आहे, पुढची काय तयारी आहे, रुग्णसंख्या का वाढत आहे आदी माहिती सभागृहाला मिळाली पाहिजे, यासाठी विरोधक आक्रमक झाले.त्यानंतर सभागृह नेते धीरज घाटे यांनी सभा तहकुबी मांडली. त्याला विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला. त्या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मतदान घेण्याची सूचना केली. या वेळी तहकुबीच्या बाजूने ६०, तर विरोधात ३४ मते पडल्यानंतर सभा २१ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या