शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Pune : पुणे महापालिकेला रेमडेसिविर इंजेक्शनच्या थेट खरेदीची परवानगी द्या : महापौरांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 18:52 IST

चार दिवस झाले तरी महापालिकेला रेमडेसिविर मिळत नसल्याचा महापौरांचा दावा...

पुणे : पुणे महापालिकेला चार दिवस झाले तरी रेमडेसिविर मिळत नसल्याचा दावा महापौर मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केली आहे. महापालिकेला थेट विकत घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने शहरातील विविध भागात हॉस्पिटल सुरू केलेली आहेत. या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना आवश्यक असलेली रेमडेसिविर इंजेक्शन गेले चार दिवस मिळत नसल्याची तक्रार महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. थेट कंपनीकडून खरेदी करण्याची परवानगी पालिकेला द्यावी. तसेच ही खरेदी होईपर्यंत राज्य सरकारकडून मिळणारा रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेसा साठा पालिकेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे. 

शहरात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाधितांना आवश्यक ते उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. सद्यस्थितीत शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलसह अन्य सहा हॉस्पिटलमध्ये १६९० कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. यातील व्हेंटिलेटर तसेच अतिदक्षता विभागातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासते. पालिकेला दररोज एक हजार इंजेक्शनची आवश्यकता असते. 

पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळावे यासाठी पालिकेने हे इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपनीला वर्क ऑर्डर देऊन खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे. सिप्ला, मायलेन यासह मोठ्या वितरकांना देखील पालिकेने संपर्क करून हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र हे इंजेक्शन केवळ राज्य सरकारला आणि जिल्हाधिकारी यांनाच उपलब्ध करून देण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे असल्याने हे इंजेक्शन पालिकेला देण्यास संबधित कंपन्यांनी असमर्थता दाखविली आहे. 

पालिकेच्या दळवी, नायडू, मुरलीधर लायगुडे, खेडेकर हॉस्पिटल बोपोडी, बाणेर येथील डीसीएचसी हॉस्पिटल, ईएसआय हॉस्पिटल बिबवेवाडी या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. पालिकेला आवश्यक असलेली ही इंजेक्शनची गरज भागविण्यासाठी पालिकेला तातडीने ही इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश संबधित कंपन्यांना द्यावेत. तसेच पालिकेची खरेदी पूर्ण होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा पुरेसा कोटा पालिकेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बिडकर यांनी केली.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसmedicineऔषधंState Governmentराज्य सरकारMayorमहापौर