शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

CoronaVirus News: धोका वाढला! संपूर्ण मेही जाणार लॉकडाऊनमध्येच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 04:50 IST

तर काही ठिकाणी नव्याने संसर्ग होत आहे. एकूणच देशभरातील लॉकडाऊन मे अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

पुणे : कोरोना नियंत्रणाबाबत भारतात वैविध्यपूर्ण परिस्थिती आहे. हॉटस्पॉट जिल्ह्यांच्या संख्येत एकीकडे घट होत आहे. तर ग्रीन झोनमधील जिल्ह्यांच्या संख्येतही घट झाली आहे. काही ठिकाणी दिलासा, तर काही ठिकाणी नव्याने संसर्ग होत आहे. एकूणच देशभरातील लॉकडाऊन मे अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पंधरा दिवसांत हॉटस्पॉट जिल्ह्यांची संख्या १७० वरून १२९ पर्यंत घटली. मात्र याच काळात ग्रीन झोन (ज्या जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही) जिल्ह्यांच्या संख्येतही ३२५ वरून ३०७ पर्यंत घट झाली. म्हणजे ग्रीन झोन असलेल्या १८ जिल्ह्यांत नव्याने कोरोना संसर्ग झाला. मात्र दुसरीकडे आॅरेंज झोन (कोरोनाबाधित आहेत, मात्र हॉटस्पॉट नाहीत असे जिल्हे) जिल्ह्यांच्या संख्येतही घट झाली. एकूणच धोकादायक भागात परिस्थिती सुधारत असली तरी ग्रीन व आॅरेंज झोनमधील संसर्ग चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत केंद्रसरकारने लॉकडाऊन संपविण्यापेक्षा झोननिहाय उपाययोजना राबविण्याची गरज तज्ञांनी व्यक्त केली आहे. रेड झोन जिल्ह्यात विभागांची संपूर्ण नाकाबंदी आदी अधिक कडक उपाययोजना राबवाव्यात. ग्रीनझोन जिल्ह्यात जिल्हा बंदी करावी व अत्यंत मर्यादित आस्थापनांना परवानगी द्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.पल्मोन्युलॉजी अ‍ॅण्ड क्रिटिकल केअर फोर्टिस नॉईडा येथील अतिरिक्त संचालक डॉ. राजेशकुमार गुप्ता यांनी रेड झोनमधील लॉकडाऊन आणखी दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ वाढविला पाहिजे. ग्रीन झोनमधील निर्बंध थोडे शिथील करता येतील. मात्र त्याठिकाणी रेड किंवा आॅरेंज झोनमधून ये-जा होणार नाही याची दक्षता घेणे, फिजिकल डिस्टन्स बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले. फुप्फुसतज्ञ डॉ. अरविंद कुमार यांनी सर्व प्रवासी वाहतूक, मॉल, धर्मस्थळे आणखी काही काळ बंद ठेवावीत, असे सुचविले आहे.कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मे महिन्यातील कडक उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत. मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल केल्यास संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमीत कमी एक महिना तरी लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मत मॅक्स हेल्थकेअरचे डॉ. रॉमेल टिक्कू यांनी व्यक्त केले.>देशातील पंधरा जिल्ह्यांवर लक्ष; सात अत्यंत घातकदेशातील १५ जिल्ह्यात कोरोनाबाधित व मृतांची संख्या खूप जास्त आहे. त्यातील ७ जिल्ह्यात तर अत्यंत घातक स्थिती आहे. केंद्र सरकारने या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केले असून, तेथे सर्व प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत. हे जिल्हे जितक्या लवकर कोरोनामुक्त करता येतील त्याच्यावर भारताचे यश अवलंबून असेल, असे निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी टिष्ट्वट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस