शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :कमी प्रतीचे सॅनिटायझर आणि मास्क विकणाऱ्या मेडिकलवर कारवाई ;पुण्यात अन्न व औषध प्रशासनाचा दणका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 14:04 IST

लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन कमी प्रतीचे सॅनिटायझर्स आणि मास्क विकणाऱ्या मेडिकल विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

 पुणे :लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन कमी प्रतीचे सॅनिटायझर्स आणि मास्क विकणाऱ्या मेडिकल विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात अशाच पद्धतीने चढ्या दराने मास्क विकणाऱ्या आणि कमी प्रतीचे सॅनिटायझर विकणाऱ्या चार मेडिकल विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांची दुकाने सील करण्यात आली आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, चीनमधून संपूर्ण जगभरात पसरत असलेल्या कोरोना विषाणूची लागण भारतातही झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा पुण्यात रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासन, महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार नागरिक सॅनिटायझर आणि मास्क वापरत आहेत. मात्र त्यातही काही मेडिकल विक्रेते संधीचा फायदा घेऊन चढ्या दराने विक्री करत आहेत. शिवाय अचानक मोठ्या संख्येने मागणी होत असल्याने कमी प्रतीचे सॅनिटायझर विकले जात आहे. यासंबंधी एफडीएने आता थेट तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. 

शहरातील कोथरूड भागातील दोन आणि म्हाळुंगे व गोखले नगर भागातील प्रत्येकी एक याप्रमाणे चार मेडिकलवर कारवाई करण्यात आली आहे. यातील काही मेडिकल जवळपास दुप्पट दराने एन -९५ मास्क विकत होते. यापुढे जर असा कोणताही प्रकार आढळला तर ०२०/२४४७०२७६ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एफडीएचे सहआयुक्त एस बी पाटील यांनी केले. शिवाय तक्रारदार fdadrugpune@gmail.com वरही संपर्क करू शकतात. 

टॅग्स :corona virusकोरोनाFDAएफडीएHealthआरोग्य