शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

CoronaVirus: ...म्हणून कोरोनावरील Fabiflub गोळ्यांवर तातडीने निर्बंध आणा: डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 07:56 IST

काही दिवसांपूर्वी ग्लेनमार्क या औषध कंपनीनं पत्रकार परिषद घेत फॅबिफ्ल्यू औषध कोरोना रुग्णांना ठणठणीत करेल, असा दावा केला होता.

पुणेः कोरोनावर निरनिराळी औषधं बाजारात येत असल्यानं गोंधळ वाढीस लागला आहे. आता राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या डॉ. अमोल कोल्हेंनीही अशाच एका औषधावर आक्षेप घेतला आहे. ग्लेनमार्क कंपनीच्या फॅबिफ्ल्यू या औषधाच्या एकूणच दर्जावर अमोल कोल्हेंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियातून अर्धवट माहिती पसरवून अनेकांची दिशाभूल केली जात आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच त्यांना या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करण्यासही सांगितलं आहे.काही दिवसांपूर्वी ग्लेनमार्क या औषध कंपनीनं पत्रकार परिषद घेत फॅबिफ्ल्यू औषध कोरोना रुग्णांना ठणठणीत करेल, असा दावा केला होता. विशेष म्हणजे कंपनीनं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचाही हवाला दिला होता. तसेच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानंही या औषधाच्या वापरास मान्यता दिल्याचं ग्लेनमार्कनं सांगितलं होतं. फॅबिफ्ल्यूच्या एका गोळीची किंमत १०३ रुपये असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यावर डॉ. अमोल कोल्हेंनी आक्षेप घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार रुग्णांना १४ दिवस या गोळ्या घ्याव्या लागतील. १४ दिवसांत रुग्णांनी १२२ गोळ्या खायच्या आहेत. त्या सर्व गोळ्यांचा एकूण खर्च १२ हजार ५०० रुपये होत आहे. एवढी किंमत सर्वसामान्यांना परवडणार आहे का?, असा सवालही अमोल कोल्हेंनी विचारला आहे.गरीब अन् मध्यम वर्गीयांना कमी किमतीत कसा उपचार मिळेल, याकडे केंद्र सरकारनं लक्ष द्यायला हवं. महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णावर याची चाचणी घेण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. पण औषधाची किंमत ठरवताना गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांचा विचार केलेला दिसत नाही. अमोल कोल्हे यांनी आरोग्य मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हे औषध लोकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून द्यावं, अशी विनंती केली आहे.तसेच फॅबिफ्ल्यू हे कोरोनावर  रामबाण औषध असल्याच्या दाव्याचंही कोल्हेंनी खंडन केलं आहे. सौम्य लक्षण असलेल्या ९० आणि मध्यम लक्षणे असलेल्या ६० रुग्णांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. पण त्यावेळी फक्त फॅबिफ्ल्यू ही गोळी नव्हे, तर इतर औषधांचाही वापर करण्यात आला आहे. ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेव्हल ९४ टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्यांना चाचणीतून वगळल्याची माहितीही सीटीआरआय संकेतस्थळावर दिलेली असल्याचा कोल्हेंनी पत्रात उल्लेख केला आहे. त्यामुळे ग्लेनमार्कच्या फॅबिफ्ल्यूच्या दाव्यावर तातडीनं पावलं उचलून त्यावर निर्बंध आणावेत, त्याप्रमाणेच डीसीजीआय आणि आयसीएमआरमार्फत चर्चा घडवून आणावी, अशी मागणी कोल्हेंनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.  

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेcorona virusकोरोना वायरस बातम्या