शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

CoronaVirus: 'डॉक्टरांना मोफत उपचारांची सक्ती करू नये'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 04:04 IST

इंडियन मेडिकल असोसिएशन; शासनाला निवेदन सादर

पुणे : राज्यातील अनेक भागांमध्ये शासनाची रुग्णालये ‘कोव्हिड’ रुग्णालयांमध्ये रूपांतरीत करण्यात आली आहेत. या काळात खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनी सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार करावेत, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. मात्र, खासगी डॉक्टर आर्थिक ताण सोसत असताना त्यांच्यावर मोफत उपचारांची सक्ती करू नये, अशा आशयाचे आवाहन आयएमएचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले आहे.संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र सध्या कोरोनाविरोधातील लढाई नेटाने लढत आहेत. खासगी डॉक्टरही शासनाला पूर्णपणे सहकार्य करत आहेत. मात्र, खासगी डॉक्टरांनी सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार करावेत, ही शासनाची अपेक्षा काहीशी अयोग्य असून त्याबाबत पुर्नविचार करण्यात यावा, असे आवाहन इंडियन मेडिकल कौन्सिलने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केले आहे.शासनाकडे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कार्यरत आहेत. शासनाने स्वतंत्र यंत्रणा तयार करून, रुग्णांना सुविधा द्यावी, असेही आएमएने म्हटले आहे.आयएमएतर्फे मोठ्या शहरांमध्ये कम्युनिटी क्लिनिक, छोटी शहरे आणि तालुक्यांमध्ये रक्षक दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आयएमएची ५० मोबाईल क्लिनिक कार्यरत असतील. कोव्हिड रुग्णांसाठी असलेल्या हाय डिपेंडन्सी सेंटरमध्ये आयएमएचे सदस्य काम पाहण्यास सज्ज आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या