शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

CoronaVirus: संपूर्ण पुणे शहर, पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून कर्फ्यू लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 00:30 IST

७ दिवस कडक अंमलबजावणी; केवळ १० ते २ जीवनावश्यक दुकाने उघडी

पुणे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुणे शहर पोलीस दलाकडून संपूर्ण पुणे शहरात प्रथम सोमवारपासून कर्फ्यु लागू करण्यात येणार आहे़ या कर्फ्युमध्ये केवळ सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतच लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सवलत देण्यात येणार आहे़ अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते़ पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते.याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, शहरातील १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अगोदरच कर्फ्युची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. तरीही कोरोनाची लागण झालेले रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात मध्यरात्रीपासून कर्फ्यू लागू करण्यात येत आहे.शहरात अनेक जण सकाळी हातात पिशवी घेऊन फिरायला बाहेर पडतात़ दुध, किराणा खरेदीचा बहाणा करतात़ त्यांनाही अडविण्यात येणार आहे़ सकाळी १० वाजल्यापूर्वी जीवनावश्यक वस्तूची विक्री करता येणार नाही़ जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच सवलत देण्यात येणार आहे़ यावेळेनंतर शहरात कोणतीही दुकाने उघडी राहणार नाहीत़ पुणे शहरात या कर्फ्युची पुढील ७ दिवस कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे़ लोकांनी घरातच राहून पोलिसांना सहकार्य करावे़ विनाकारण घराबाहेर पडणाºयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनीही असेच आदेश काढले आहेत़ संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कर्फ्युची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वृत्तपत्रे, तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी मुख्य रस्त्यांवरुन वाहनांना जिल्ह्यात जाण्यास व येण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. जीवनावश्यक साहित्याची वाहतूक करणाºया वाहनांनी महामार्गाचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनीही असेच आदेश काढले आहेत़ संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड