शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पुण्यातील एनआयव्हीमध्ये ‘कोरोना’वर होते अंतिम शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 06:50 IST

काळजी घ्या, विलगीकरण महत्त्वाचे, शास्त्रज्ञ बाबासाहेब तांदळे यांचे आवाहन

राजानंद मोरे/राहूल गायकवाड पुणे : ‘देशभरातील विविध प्रयोगशाळांमध्ये कोरोना नमुन्यांची तपासणी होत असली तरी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) केले जात आहे. या संस्थेतील शास्त्रज्ञांकडून संबंधित नमुन्यांची पुन्हा तपासणी केली जात आहे. तसेच निगेटिव्ह आलेल्या नमुन्यांमधील सुमारे १० टक्के नमुन्यांची तपासणीही पुन्हा ‘एनआयव्ही’मध्ये होत आहे. तसेच सध्या दररोज ५० ते ६० नमुन्यांची तपासणी केली जात आहे. ही क्षमता २०० ते ३०० पर्यंत वाढू शकते,’ अशी माहिती ‘एनआयव्ही’तील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब तांदळे यांनी दिली.‘कोरोना’विषयीच्या विविध मुद्यांवर तांदळे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, विमानतळावर तपासणी झाल्यानंतर संबंधित प्रवाशामध्ये काही लक्षणे असतील तर त्याला विलगीकरण कक्षात दाखल केले जाते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही रुग्णालयात दाखल केले जाते. त्यांचे नमुने ‘एनआयव्ही’सह अन्य अधिकृत प्रयोगशाळांमध्ये पाठविले जातात. सध्या ५० हून प्रयोगशाळांमध्ये नमुन्यांची तपासणी केली जात आहे. प्राथमिक तपासणी याठिकाणी होते. एखादा नमुना पॉझिटिव्ह आला तर ते नमुने पुन्हा ‘एनआयव्ही’मध्ये येतात. तिथे तपासणी झाल्यानंतर अंतिम शिक्कामोर्तब केले जाते. तसेच निगेटिव्ह नमुन्यांपैकी किमान १० टक्के नमुन्यांची पुन्हा एनआयव्हीमध्ये तपासणी होते. यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यादृष्टीने दक्षता घेतली जाते.एनआयव्हीमध्ये दररोज २०० ते ३०० नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता आहे. आमच्याकडे सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ प्रशिक्षित आहेत. सध्या अन्य प्रयोगशाळांमध्येही तपासणी वाढल्याने एनआयव्हीमध्ये केवळ जवळपासचे किंवा पॉझिटिव्ह आलेले नमुने पुन्हा तपासणीसाठी येत आहेत. इटली, इराण अन्य काही देशांमधून घेण्यात आलेल्या नमुन्यांचे प्रमाण काहीसे अधिक आहे. दैनंदिन तपासणीसाठी ८ ते १० शास्त्रज्ञ असून जवळपास ३० तंत्रज्ञही असल्याचे तांदळे यांनी नमूद केले.\बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनाही विलग करणे आवश्यक आहे. त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये, हे टाळणे आवश्यक आहे. लागण झालेल्या व्यक्तीशी संपर्क आला नसेल तर कुणीही घाबरू नये. दैनंदिन काळजी घेतल्यास कोणताही संसर्ग होणार नाही.- डॉ. बाबासाहेब तांदळे,वरिष्ठ शास्त्रज्ञ, एनआयव्ही रुग्णालयातून पळालेला रुग्ण परतलाकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भोसरी येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील एका रुग्णाsने पलायन केले होते, मात्र, त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.भोसरी येथील एका रुग्णाने शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयातून पलायन केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशासन व पोलिसांची धावपळ झाली. पोलिसांनी रुग्णाला ताब्यात घेतले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ससून रुग्णालयाला तातडीने ५ कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोनाPuneपुणे