शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
3
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
4
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
5
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
6
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
7
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
8
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
9
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
10
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
11
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
12
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
13
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
14
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
15
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
16
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
17
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
18
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
20
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी शहरात कोविड केअर केंद्राची उभारणी - नवल किशोर राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 16:19 IST

केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पुणे शहराकरिता कोवीड १९ करिता पुणे महानगरपालिकेमार्फत कोवीड १९ साठी कोरोना संशयित व कोरोना बाधित रुग्णांच्या कोवीड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.

पुणे - शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोवीड-१९ साठी कोरोना संशयित व कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी (कोवीड केअर सेंटर)डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. याबाबत राम यांनी सांगितले राज्याचे मुख्य सचिवांनी नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. यात त्यांनी तातडीने केंद्र सरकारच्या आरोग्य व स्वास्थ्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.त्यानुसार केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पुणे शहराकरिता कोवीड १९ करिता पुणे महानगरपालिकेमार्फत कोवीड १९ साठी कोरोना संशयित व कोरोना बाधित रुग्णांच्या कोवीड केअर सेंटर,(डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल)च्या उपाययोजनांबाबत अंतर्गत शासकीय व खाजगी हॉस्पिटलमार्फत खालील प्रमाणे उपाययोजना व नियोजन करण्यात आलेले आहे.पुणे महानगरपालिका कोवीड केअर सेंटर-৭) ढोले पाटील रोड- नगर रोड नगररोड-वडगावशेरी संगमवाडी (रक्षक नगर क्रीडा संकुल, खराडी) -डॉ.स्वाती घनवट ९५५२५३४४९६(2) घोले रोड-शिवाजीनगर कै.द्रौपदाबाई कोथरुड बावधन औंध-बाणेर हॉस्पिटल,बोपोडी -८८०६६६८७४७ डॉ.स्वाती बढीये३)- सहकारनगर-धनकवडी, सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर , कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडेदवाखाना,वडगाव धायरी,९८२२४११३७१डॉ.शुभांगी शहा(४) हडपसर-मुंढवा कोंढवा-येवलेवाडी वानवडी-रामटेकडी, कै.नामदेवराव शिवरकर प्रसुतिगृह,वानवडी कै.मिनाताई ठाकरे प्रसुतिगृह,कोंढवा, डॉ.जयंत कांबळे ९६८९९१८८४७, डॉ.रुचिता फाटक ९७६५३९०२०२(५)कसबा-विश्रामबाग वाडा, भवानी पेठ बिबवेवाडी (सेंटरचे नाव- सणस मैदान होस्टेल -७२७६०२७४२१ डॉ.अमोल राठोडया ५ कोवीड केअर सेंटरवर एकूण ३७५ खाटांची सोय करण्यात आली आहे, असे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी कळविले आहे.पुणे शहरातील कोरोना बाधित आणि संशयित रुग्णांसाठी पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयानुसार पाच भागात कोविड केअर केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ढोले पाटील रोड- नगररोड- वडगावशेरी- संगमवाडी या परिसरातील नागरिकांसाठी रक्षक नगर क्रीडा संकुल, खराडी येथे 70 खाटांची, घोलेराडे- शिवाजीनगर-कोथरुड- बावधन-औंध-बाणेर या परिसरातील नागरिकांसाठी कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी येथे 50 खाटांची, सहकारनगर- धनकवडी- सिंहगड रोड- वारजे- कर्वेनगर या परिसरातील नागरिकांसाठी कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखाना, वडगाव धायरी येथे 60 खाटांची, हडपसर- मुंढवा-कोंढवा- येवलेवाडी- वानवडी- रामटेकडी या परिसरातील नागरिकांसाठी कै. नामदेव शिवरकर प्रसुतीगृह वानवडी व कै. मीनाताई ठाकरे प्रसुतीगृह कोंढवा येथे प्रत्येकी 10 खाटांची व्यवस्था आणि कसबा-विश्रामबागवाडा- भवानीपेठ-बिबवेवाडी या परिसरातील नागरिकांसाठी सणस मैदान हॉस्टेल येथे 175 खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.कोणत्याही नागरिकाला सर्दी, खोकला, घसादुखी, ताप, दम लागणे अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांनी त्वरित या कोविड केअर केद्रांत तपासणी करीता जावे, असे आवाहनही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.