शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

Coronavirus Baramati : कोरोनाबाधितांच्या उच्चांकाने बारामती हादरली; एकाच दिवसात आढळले ३९५ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 21:25 IST

'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंध असुन देखील कोरोनाची आकडेवारी वाढतच असल्याने चिंता वाढली आहे.

बारामती: शहरात गेल्या २४ तासात ३९५ एवढ्या उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.त्यामुळे बारामतीकर हादरुन गेले आहेत.ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध असुन देखील कोरोनाची आकडेवारी वाढतच असल्याने चिंता वाढली आहे.

 गेल्या २४ तासात एकूण आरटीपीसीआर नमुने ६८७ तपासण्यात आले.त्यापैकी एकूण बारामतीमधील १५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले  आहेत.यामध्ये इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण १० आहेत.  काल तालुक्यामध्ये खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण आरटीपीसीआर त्यापैकी पॉझिटिव्ह २४ आहेत. कालचे एकूण एंटीजन २३६. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह १०२ आले आहेत.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३९५ आहेत. यामध्ये  शहर १८९ ग्रामीण २०६ रुग्णांचा समावेश असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.

आजपर्यंत बारामतीत एकूण रूग्णसंख्या १४ हजार २८२ वर पोहचली आहे.तर एकूण बरे झालेले रुग्ण १०,८०१ वर गेले आहेत.दरम्यान,शहरात  )५ पेक्षा जास्त कोरोना विषाणू संक्रमीत रूग्ण आढळून आल्यास संबंधित परिसर हा सूक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र  म्हणून घोषित करणेत येत आहे. त्यामुळे नागरीकांनी  वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरातील ,परिसरातील सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ विलगीकरणात राहावे.

कोव्हिड-१९ बाबत लक्षणे तीव्र झाल्यास अगर आढळून आल्यास त्वरीत वैद्यकीय अधिकारी यांचेशी संपर्क करून रूग्णालयात दाखल व्हावे. सोसायटी व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना संबंधित परिसरात येण्यास प्रतिबंध असल्याने त्यांना अत्यावश्यक सेवेच्या कामाव्यतिरिक्त आत येवू देवू नये. यासंबंधित फलक सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ सोसायटीमार्फत लावण्यात यावा.  क्षेत्रामध्ये दुचाकी/चारचाकी वाहनांना प्रतिबंध करणेत येत आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या, सूक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्रातील  रहिवाशांवर/सोसायटीवर रक्कम रुपये १०,०००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सोसायटीमध्ये नियमित येणा-या कामगारांची चाचणी करावी,अशी सुचना बारामती नगरपरीषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी दिली आहे.———————————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAjit Pawarअजित पवारcollectorजिल्हाधिकारी