शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Corona virus : कदमवाकवस्ती परिसरातील तीन जण कोरोनाबाधित; रुग्णांवर उपचार सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 16:59 IST

पासष्ठ वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेले आठ जण क्वारंटाईन

पुणे : लोणी काळभोर जवळील कदमवाकवस्ती परिसरात वावर असणारे व तांत्रिकदृष्ट्या फुरसुंगी हद्दीत वास्तव्यास असलेल्या एका पासष्ठ वर्षीय महिलेसह दोन जण कोरोनाबाधित असल्याचे गुरुवारी (ता. ४) आढळुन आले आहे. पासष्ठ वर्षीय महिलेला हडपसर येथील खासगी रुग्णालयात तर उर्वरीत दोन जणांना सिंहगड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पांडवदंड परिसरात वावर असणारे मात्र तांत्रिकदृष्ट्या फुरसुंगी हद्दीत रहिवाशी असलेल्या तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पासष्ठ वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेले पाच जण तर उर्वरीत दोन जणांच्या संपर्कात आलेले तीन जण अशा आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची अशी माहिती फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अरविंद कोकाटे यांनी दिली.        कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड परिसरात मात्र फुरसुंगी हद्दीत नव्याने वसलेल्या एका नगरातील महिलेचा व दोन पुरुषांचा कोरोना रिपोर्ट गुरुवारी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आला आहे. तीनही कोरोनाबाधित रुग्ण फुरसंगी हद्दीतील रहिवाशी असले तरी, वरील तीनही रुग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांचा वावर कदमवाकवस्ती हद्दीतील पांडवदंड परिसरात असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.              दरम्यान याबाबत अधिक बोलताना कदमवाकवस्तीचे ग्रामविकास अधिकारी प्रविण देसाई म्हणाले, वरील तीनही रुग्ण फुरसंगी हद्दीतील रहिवाशी असल्याने, याबाबत योग्य ती काळजी घेण्याबाबत महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नागरिकांना घराातुन बाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस