शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुण्यात रहिवासी म्हणतायेत, डॉक्टर आमच्या शेजारी नको..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 14:38 IST

सर्वाधिक धोका पत्करून डॉक्टर व पारिचारिका संशयित रुग्णांवर उपचार करत आहे..

ठळक मुद्देअधिकाऱ्यांकडे विनवणी : ससूनमधील डॉक्टरांना विरोध

पुणे : ससून रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांच्या राहण्याची व्यवस्था परिसरातील हॉटेलमध्ये केली जाणार आहे. पण काही हॉटेल चालकांनी हॉटेल देण्यास नकार दिला आहे. पण या हॉटेल जवळ असलेल्या सोसायट्यांमधील रहिवाशांनी तर माणुसकीच सोडून दिल्याचा अनुभव अधिकाऱ्यांना आला आहे. आमच्या शेजारील हॉटेलमध्ये डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था नको, अशी विनवणीच अधिकाऱ्यांकडे केली आहे.जगभरात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ नयेत, म्हणून संपुर्ण भारतात लॉकडाऊन आहे. सगळीकडे भीतीचे वातावरण असताना डॉक्टर, परिचारिका तसेच अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी आपल्या सेवेत कसूर न करता लोकांच्या मदतीसाठी धावपळ करत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व परिचारिकांना तर कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका आहे. पण असे असतानाही या लढ्यात ते आपल्या जीवाची पर्वा न करता सहभागी झाले आहेत. त्यांच्या कुटूंबियांना संसर्ग होऊ नये म्हणून ससूनमधील डॉक्टर, परिचारिका व इतरांच्या राहण्याची व्यवस्था जवळच्या हॉटेल्समध्ये केली जात आहे. पण काही हॉटेल चालकांनी त्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे काही डॉक्टरांची व्यवस्था शासकीय विश्रामगृहात करण्यात आली आहे. पण ही जागा पुरेशी नसल्याने प्रशासनाला हॉटेल ताब्यात घ्यावीच लागणार आहेत. ही हॉटेल ताब्यात घेताना प्रशासनाला शेजारील रहिवाशांकडून वेगळाच अनुभव येत आहे.याविषयी बोलताना तहसिलदार तृप्ती कोलते म्हणाल्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेप्रमाणे ससून रुग्णालय परिसरातील हॉटेल चालकांना डॉक्टरांसाठी खोल्या देण्याबाबत विनंती करण्यात आली. काही हॉटेल चालकांनी त्यास नकार दिला आहे. पण या हॉटेल परिसरातील रहिवाशांनीही हॉटेलमध्ये डॉक्टर व परिचारिकांची राहण्याची व्यवस्था करण्यास विरोध केला. आमच्याशेजारी त्यांना ठेवू नका, असा पवित्रा त्यांनी घेतला. हे ऐकून आम्हीही अवाक झालो. सध्याच्या परिस्थितीत समाजाने असा दुषित दृष्टीकोन सोडून द्यायला हवा. डॉक्टर, परिचारिकांकडून सर्वतोपरी दक्षता घेतली जाते. त्यामुळे समाजानेही त्यांना साथ द्यायला हवी, असे आवाहन कोलते यांनी केले.

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलhotelहॉटेल