शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

corona virus ;पुणेकरांसाठी गुढी पाडवा घेऊन आला आनंदवार्ता : कोरोनाचे पाच रुग्ण झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 09:01 IST

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राज्यातील पहिल्या रुग्ण दाम्पत्यासह त्यांची मुलगी, कॅब चालक आणि सह प्रवासी असे पाच पूर्णपणे बरे झाले आहेत.

ठळक मुद्देपुणेकरांसाठी गुढी पाडवा घेऊन आला आनंदवार्ता : कोरोनाचे पाच रुग्ण झाले बरेमहापालिकेसह डॉ. नायडू रुग्णालयातील डॉक्टरांना आले यश

पुणे : कोरोनाचे रुग्ण एका पाठोपाठ एक वाढत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले असतानाच हा गुढी पाडवा पुणेकरांसह राज्यातील नागरिकांसह आनंदाची बातमी घेऊन आला आहे. पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राज्यातील पहिल्या रुग्ण दाम्पत्यासह त्यांची मुलगी, कॅब चालक आणि सह प्रवासी असे पाच पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून या दाम्पत्याला बुधवारी घरी सोडण्यात येणार असून उर्वरीत तिघांना गुरुवारी घरी सोडण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.देशभरात कोरोनाच्या भितीमुळे लॉक डाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टस्टिंग ठेवून वागावे असे आवाहन केले जात आहे. संशयितांना डॉ. नायडू रुग्णालयासह शहरातील अकरा रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अनेक संशयितांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. पुण्यामध्ये राज्यातील पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर त्याला नायडू रुग्णालयात उपचारांसाठी ९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. या रुग्णाची पत्नीही कोरोना बाधित झाली होती. विदेशवारी करुन आलेल्या या दाम्पत्याची मुलगी आणि हे दाम्पत्य मुंबईहून पुण्याला ज्या कॅबमधून आले त्या कॅबचा चालक हे सुद्धा बाधित झाले होते. या दाम्पत्यासह विदेशवारी केलेला आणखी एक सह प्रवासी सुद्धा बाधित झाला होता.या सर्वांना डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. चौदा दिवसांनंतर दाम्पत्याच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यावर दुस-यांदा हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्टही निगेटीव्ह आल्याने हे दाम्पत्य पुर्णपणे बरे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना बुधवारी गुढी पाडव्याच्या दिवशीच घरी सोडण्यात येणार आहे.त्यांच्या संपर्कातील त्यांची मुलगी, कॅब चालक आणि सह प्रवासी यांचेही चौदा दिवसांनंतरचे पहिल्या नमुन्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यांचा दुसरा अहवाल बुधवारी संध्याकाळपर्यंत प्राप्त होणार असून हे रिपोर्ट निगेटीव्ह  आल्यास त्यांनाही गुरुवारी घरी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.

महापालिकेने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून डॉ. नायडू रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पुण्यातील रुग्णांचा आकडा १९ असून त्यातील पाच रुग्ण बरे झाल्याने हा आकडा १४ पर्यंत खाली आला आहे. ज्यांना घरी सोडण्यात येणार आहे त्या रुग्णांना आणखी चौदा दिवस होम क्वॉरंटाईन करुन राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या हातांवर शिक्के मारण्यात आले आहेत. यासोबतच त्यांच्या घराबाहेर होम क्वॉरंटाईनचे स्टिकर लावण्यात आल्याचे अतिरीक्त आयुक्त अगरवाल यांनी सांगितले.

प्रतिक्रिया :पुण्यातील पाच रुग्ण उपचार घेऊन पुर्ण बरे झाले आहेत. ही समाधानाची बाब आहे. पालिका, जिल्हाप्रशासन, डॉक्टर्स यांनी केलेल्या उपाययोजनांचे हे फलित आहे. नागरिकांना काही लक्षणे दिसल्यास आमच्याशी संपर्क साधून उपचार घ्यावेत. ही उपचार पद्धती अत्यंत सोपी असून रुग्ण बरे होतात. याबद्दल भिती बाळगण्याचे कारण नाही. ज्या रुग्णांना आता घरी सोडण्यात येणार आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यांना चौदा दिवस होम क्वॉरंटाईन राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.- रुबल अगरवाल, अतिरीक्त आयुक्त, पुणे महापालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या