शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus in Pune : पुणे शहरात शनिवारी तब्बल ८०८ जणांना 'डिस्चार्ज',आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १६ हजार ९९६

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 21:31 IST

शहरात दिवसभरात ८२७ नवीन कोरोनाबाधितांची वाढ झाली.

ठळक मुद्दे४६१ रुग्ण अत्यवस्थ, १६ जणांचा मृत्यू

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत शनीवारी ८२७ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २६ हजार ९०४ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ८०८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४६१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ९ हजार ९२ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

शनिवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ८२७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ६७८ तर खासगी रुग्णालयांमध्ये १४४ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४६१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३९७ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 

शहरात शनीवारी १६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८१६ झाली आहे. दिवसभरात एकूण ८०८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ५७२ रुग्ण, ससूनमधील १९ तर  खासगी रुग्णालयांमधील २१७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १६ हजार ९९६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ९ हजार ९२ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ५११ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ५९ हजार ३४१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे ८८७ लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल