शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे महापालिकेचे काही नगरसेवक ठरवताहेत रेमडेसिविर कधी द्यायचं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 22:10 IST

खासगी कोविड सेंटरला इशारा : नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई 

पुणे : खासगी रुग्णालयांसोबत करार करून आपापल्या भागात कोविड केअर सेंटर उभारण्याची नगरसेवक, राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. आतापर्यंत अशा प्रकारची २६ रुग्णालये उभारण्यात आली आहेत. या कोविड सेंटरमध्ये गंभीर रुग्णांना ठेवता येत नाही. मात्र, काही नगरसेवक रुग्णाचा एचआरसीटी स्कोर १८ असतानाही रेमडेसिविर द्या अशी मागणी करत आहेत. त्यामुळे अधिकारी वैतागले आहेत. 

या कोविड सेंटरमध्ये साध्या खटांसह ऑक्सिजन, आयसीयू खाटांची परवानगी मिळावी यासाठी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी प्रशासनावर दबाव टाकत आहेत. शहरात ऑक्सिज पुरवठा कमी होत असल्याने हे अधिकार आयुक्तांनी स्वतःकडे ठेवले आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या आयुक्त कार्यालयात फेऱ्या वाढल्या आहेत.

दरम्यान, या कोविड सेंटरवर पालिकेचे अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट कारवाई केली जाईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिला आहे. शहरातील रुग्ण वाढल्याने खाटा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने खासगी रुग्णालयांसोबत करार करून कोविड रुग्णालय सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. पुणे शहरात ९ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीमध्ये अशा प्रकारचे २६ कोविड सेंटर सुरू झाले आहेत. जागेवर पाहणी न करता अग्निशामक दलाकडून  ना हरकत प्रमाणपत्र दिली जात असल्याचे समोर आले आहे. ----नियमाप्रमाणे खासगी कोविड सेंटर सुरू आहेत की नाही याची पाहणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केली जात आहे.  नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये मोफत उपचार केले जातात. खाजगी कोविड सेंटर सुरू इच्छिणार्‍या संस्थानी पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये सुविधा पुरविण्यासाठी पुढे यावे. 

- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका----

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारणmedicineऔषधंPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका