शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
4
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
5
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
6
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
7
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
8
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
9
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
10
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
11
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
12
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
13
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
14
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
15
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
16
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
17
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
18
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
19
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...

Corona Virus Pune : 'होम क्वारन्टाइन' रुग्ण घटले, गंभीर रुग्ण १० हजारांच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 21:19 IST

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देआकडा खाली असला तरी चिंता कायम : मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान 

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत चाललेला असताना सक्रिय रुग्णही कमी झाले आहेत. गृह विलगीकरणामध्ये असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर बरे झाले आहे. परंतु, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या मात्र, दहा हजारांच्या घरात असल्याने  चिंता व्यक्त केली जात आहे. 

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरामध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. मार्च आणि एप्रिल हे महिने पुणेकरांसाठी अत्यंत घातक ठरले. या काळात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुसज्जता निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. बेडची संख्या १४ हजारांच्या पार नेण्यात पालिका प्रशासनाला यश आले. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्याने प्रशासन देखील हतबल झाले होते.  सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजारांच्या पुढे गेल्यामुळे या चिंतेमुळे अधिकच भर पडली होती. 

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली आहे. राज्य शासनापाठोपाठ पालिकेनेही १५ एप्रिलपासून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या उपाययोजनांचा परिणाम हळूहळू दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रुग्ण संख्याही कमी होत चालली आहे.

सक्रिय रुग्णांचा आकडा खाली आला असला तरी गृह विलगीकरणामधील रुग्णांचा आकडा सर्वाधिक कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. परंतु व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्ण, पालिकेचे रुग्णालय आणि केअर सेंटर मधील रुग्णालय या सर्वांची संख्या दहा हजारांच्या घरात असल्याने अजूनही गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही.

मागील महिन्यापर्यंत सक्रिय रुग्णांपैकी गृह विलगीकरणामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ६५ ते ७० टक्‍क्‍यांच्या दरम्यान होते. मात्र, ते आता ५० टक्क्यांवर आले असून ५०  टक्के रुग्ण ही रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.-------रुग्ण आकडेवारी 

तारीख  सक्रिय रुग्ण  गृह वि.   स.रुग्णालय खा. रुग्णालय कोविडसेंटर१५ ए.   ५४,३५१       ४५,४५६।२०५३।      ६२२१।           ६२१६ मे      ३९,५८२        २९,४४३/२२५५।      ७०४३।         ८४११२ ए.   २५२२२।       १४९१८।  ४६२०।      ३४९४।         २१९०

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल