शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

Corona virus Pune: दिलासादायक! पुणे शहरात शुक्रवारी ९७३ नवे कोरोनाबाधित; २ हजार ४९६ जणांची कोरोनावर मात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 19:58 IST

आजमितीला शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही १३ हजार ४७९ वर आली आहे.

 पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी पुन्हा एक हजाराच्या आत आली असून, आज दिवसभरात शहरात केवळ ९७३ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.या आठवड्यात रूग्णवाढ सातत्याने कमी झाल्याचे दिसून आले असून,यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही १३ हजार ४७९ वर आली आहे. आज दिवसभरात २ हजार ४९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

आज दिवसभरात ११ हजार ६७६ जणांनी कोरोनाची तपासणी करून घेतली. रविवारपासून तपासणीचे प्रमाण दहा हजारांच्या पुढे आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात ४१ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २२ जण पुण्याबाहेरील आहेत. 

ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्याही आता शहरात पाच हजाराच्या आत आली असून, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार २७९ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. तर १ हजार ३१५ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २४ लाख १६ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६४ हजार ७६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ४२ हजार ६६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर आतापर्यंत शहरात ७ हजार ९२८ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस