शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : हवेलीत पंधरा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या तीनपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 19:41 IST

गावांमधून बाहेर पडणाऱ्यांना द्यावे लागणार हमीपत्र

ठळक मुद्देपुणे शहरातील रेडझोन क्षेत्रांमधून जा ये करणाऱ्यांची संख्या अधिक

पुणे : हवेली तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत तब्बल तीन पटीने वाढ झाली आहे. तालुक्यात १५ जून रोजी १४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. आज ही ३० जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल ३२८ झाली आहे. यामुळे संपूर्ण हवेली तालुका कोरोनाच्या विळाख्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त गावांमधून दररोज जाणाऱ्या व्यक्तींकडून हमीपत्र लिहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश पंचायत समितीच्या वतीने सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत.

हवेली तालुक्यामध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३२८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यातील १७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. सध्या १४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ ४० होती, आज १४७ वर जाऊन पोहचली आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे शहर आणि परिसरामध्ये दररोज ये-जा करणाऱ्या नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा रुग्णांमध्ये समावेश आहे. 

हवेली तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने वाघोली, कदमवाक वस्ती, मांजरी आणि नऱ्हे आंबेगाव या गावांमध्ये पंधरा दिवसांपूर्वीच बारामती पॅटर्न लागू केला होता. परंतु गावकऱ्यांनीच या प्रकारच्या अंमलबजावणीस विरोध केल्याने कंटेन्मेंट झोनची अधिसूचना अंमलबजावणीचे आदेश मागे घेतले होते. नागरिकांकडून स्वयंशिस्त पाळली जात नाही, तसेच पुणे शहरातील रेडझोन क्षेत्रांमधून जा ये करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच शहरातील रुग्णालयांमध्ये काम करणारे डॉक्टर आणि परिचारिका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा बहुतांश कर्मचारी वर्ग हा हवेली तालुक्याच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.हवेली पंचायत समितीने गावांमधून पुणे शहरांमध्ये दररोज नोकरी आणि व्यवसायनिमित्त जाणाऱ्या नागरिकांकडून हमीपत्र लिहून घेण्याचे आदेश ग्रामपंचायतींना दिले आहेत. यामध्ये संबंधित व्यक्ती पुणे शहरामध्ये कोणत्या ठिकाणी कामाला आहे, काय काम करते, दिवसभरात त्यांना कामानिमित्त कोठे फिरावे लागते, ते क्षेत्र कंटेन्मेंट झोनमध्ये आहे या सर्वबाबींचा अंतर्भाव हमीपत्रमध्ये आहे. तसेच कोरोनाविषयक नियमावलीची देखील हमी या व्यक्तीकडून घेतली जात आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल