शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे महापालिकेच्या दळवी रुग्णालयात कर्मचाऱ्यांअभावी ऑक्सिजन बेड्स धूळखात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 12:43 IST

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही पालिकेला आपल्या रुग्णालयांसाठी डॉक्टर, परिचारिका उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त

ठळक मुद्देदळवी रुग्णालय : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

राजानंद मोरे-पुणे : ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पायपीट करावी लागत असताना दुसरीकडे महापालिकेच्या दळवी रुग्णालयातील ६० हून अधिक ऑक्सिजन बेड कर्मचाऱ्यांअभावी धूळखात पडून आहेत. घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही पालिकेला आपल्या रुग्णालयांसाठी डॉक्टर, परिचारिका उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.शहरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, अ‍ॅक्टिव रुग्ण त्याप्रमाणात वाढत नाहीत. तसेच अनेक रुग्ण घरी विलगीकरणात राहण्याला प्राधान्य देत आहेत. परिणामी पालिकेची कोविड सेंटरवरील ताण कमी झाला आहे. पालिकेने ८ ते १० सेंटर रुग्णांअभावी बंदही केले आहेत. असे असतानाही डॉक्टर, परिचारिकांचा तुडवडा भासत असल्याचे चित्र आहे. नायडू रुग्णालयासह महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याच्या तेथील डॉक्टरांच्या तक्रारी आहेत.महापालिकेच्या दळवी रुग्णालयामध्ये ‘क्रेडाई’ या संस्थेने सामाजिक दायित्वातून सुमारे १८० ऑक्सिजन बेड व्यवस्था केली आहे. त्यामध्ये १० आयसीयु बेड आहेत. त्यासाठी लिक्विड आॅक्सिजन टँकची उभारणीही करण्यात आली आहे. एक-दीड महिन्यापुर्वी हे रुग्णालय कोरोनाबाधितांसाठी सुरू करण्यात आले. मात्र, सध्या या रुग्णालयात केवळ ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये ३० ऑक्सिजन बेडवर तर १० रुग्ण आयसीयुमध्ये आहेत. आॅक्सिजनची गरज नसलेले रुग्णही रुग्णालयात दाखल केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. रुग्णालयातील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर प्रत्येकी ५० अशा एकुण १०० बेड तयार आहेत. तसेच पहिल्या मजल्यावरही काही बेड सुसज्ज करण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या मजल्यावर १० आयसीयु आहेत. त्यामुळे ६० हून अधिक ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. कर्मचारी नसल्याने रुग्ण घेत नसल्याचे येथील डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.-----------------महापालिकेची बंद रुग्णालये सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. पण सध्या सुरू असलेल्या रुग्णालयांमध्येच परिचारिका व डॉक्टर उपलब्ध करून देणे महापालिकेला शक्य होत नाही. तर दुसरीकडे जम्बो रुग्णालय व्यवस्थापनाकडून काही दिवसांत ३०० बेडसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल