शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : ‘हॉटस्पॉट’येरवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेला "तो " तरुण दारु विक्रेता नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:58 IST

पोलीस, प्रशासनाची उडाली धांदल  

ठळक मुद्देयेरवड्यात दोनशे रूग्ण, आतापर्यंत आठ जणांचा बळी, तीस वर्षीय तरूणाचा समावेश 

पुणे : येरवडा येथील एका तीस वर्षीय तरूणाला शुक्रवारी (दि.१) श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु , नंतर त्याची कोरोना तपासणी चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, अवघ्या चारच दिवसात त्याचा उपचारादरम्यान सोमवारी (दि.४ )मृत्यू झाला. त्यानंतर तो दारु विक्री करत होता व त्यादरम्यानच त्याला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. परंतु, हा तरुण दारु विक्रेता असल्याची कोणतीही नोंद पोलिसांकडे नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच तो गेले काही दिवस आजारी होता व त्याला कोरोनासोबतच मधुमेहाचा देखील आजार होता अशी माहिती आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित त्या तरुणाच्या कुटुंबातील आठ जणांची कोरोना तपासणी केली असता सर्वजणांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले. येरवड्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून सुमारे दोनशे हून अधिक रूग्ण येरवडा क्षेत्रीय कार्यालय विभागात आहेत. या गंभीर आजारामुळे आतापर्यंत येरवड्यातील आठ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. त्यात एका तीस वर्षीय तरूणाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला आहे. मात्र अजूनही येरवडा व परिसरातील नागरिक कोरोनाबाबत गंभीर नाहीत. त्यामुळे या परिसरात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.वाढत्या आजाराचा धोका लक्षात घेता नियमांचे उल्लंघन करणा?्यांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. 

येरवडा परिसरात मोठ्या प्रमाणावर हातभट्टीसह अवैध दारूची विक्री केली जाते. लाँकडाऊन नंतर तेथे चढ्या दराने विक्री सुरू होती. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तरूणाबाबत तो दारू विक्री करत होता अशी कोणतीच नोंद पोलिसांकडे नाही. कंजारभाट समाजातील तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात नागरिकांना धक्का बसला आहे. महापालिकेच्या वतीने सदरचा परिसर सील करण्यात आला आहे. 

येरवडा क्षेत्रीय कार्यालय विभागात लक्ष्मीनगर, पर्णकुटी पायथा, मदर तेरेसा नगर, यशवंत नगर सह नागपूरचाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, टिंगरेनगर, कळस, इंदिरा नगर, या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. हा संपूर्ण परिसर कन्टेन्मेंट झोन असून नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र नागरिक अजून ही गंभीर नाहीत. अनावश्यक रस्त्यावर फिरणे, भाजी व वस्तू खरेदीसाठी गर्दी करणे यामुळे आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आगामी काळात पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

..............................

येरवडा भाटनगर येथील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तरूणावर येरवडा पोलिस स्टेशन येथे अवैध दारूविक्री अथवा इतर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची नोंद मिळून येत नाही -  युनुस शेख वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस स्टेशन.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस