शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News : पुण्यातील सिंहगड हॉस्टेल कोविड केअर सेंटर 'विशेष' रुग्णांसाठी ठरतेय आधारवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 11:37 IST

जन्मजात अथवा अपघाताने शारीरिक व मानसिक व्यंग आलेल्या रुग्णांसाठी सिंहगड हॉस्टेल कोविड सेंटर आधारवड ठरत आहे..

ठळक मुद्देगेल्या सहा महिन्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची अविरत सेवा

पुणे : कोरोनामुळे एकीकडे जवळची नाती दूर पळत असतानाच दुसरीकडे कोविड सेंटरमधील हजारो हात रूग्णांची सेवा करीत आहेत. अशाच कोंढव्यातील कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या 'विशेष' रूग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. यामध्ये ऑटीझम, मल्टीपल डाऊन सिंड्रोम, सक्लेरोसीस या प्रकारातील म्हणजे ज्याला स्वतःच्या दैनंदिन क्रिया करण्यासाठीही दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते अशा रुग्णांवर आईच्या ममतेने उपचार केले जात आहेत.

जन्मजात अथवा अपघाताने शारीरिक व मानसिक व्यंग आलेल्या रुग्णांसाठी सिंहगड हॉस्टेल कोविड सेंटर आधारवड ठरत आहे. गेल्या सहा महिन्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अविरत सेवा देत असलेल्या या सेंटरच्या प्रमुख डॉ. दिप्ती बच्छाव व डॉ. किरण लाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वैद्यकीय विभाग या 'विशेष रुग्णांना' कुटुंबातील सदस्यांप्रमाणे उपचार आणि आधार देत आहेत.या रुग्णांना अगोदरपासून सुरु असलेली (कोरोना उपचाराव्यतिरिक्तची) औषधे वेळेवर दिली जात आहेत का?, त्यांना मिळणारा आहार ठरवलेल्या वेळेत मिळत आहे का? याची विशेष काळजी घेतली जात आहे. यासोबतच ते व्यक्त करू शकत नसलेली त्यांच्या आरोग्याची समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या संस्थेमधील व्यक्तींसोबत संपर्क साधला जातो. उपजत लाजाळूपणा असणारे हे रुग्ण दोन-तीन दिवसांच्या सहवासानंतर वैद्यकीय टीमला उत्तम प्रतिसाद देत असल्याचे डॉ. बच्छाव यांनी सांगितले.समाजापासून नेहमीच वेगळे असलेले आणि नियतीचा घाला सोसलेले या विशेष व्यक्ती बऱ्या होण्यासाठी सर्वजण आपुलकीने काम करीत आहेत. हे रुग्ण प्रत्यक्ष बोलून आपली भावना व्यक्त करू शकत नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाची भावना येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अनुभवत आहेत.सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या सर्वच वयोगटाच्या रुग्णांवर दक्षता घेऊन उपचार केले जातात. पण दुसऱ्याचा आधार घेऊन जीवन जगत असलेल्या स्वमग्न रुग्णांवर उपचार करत असताना प्रसंगी डॉक्टरी अभिनिवेश बाजूला ठेऊन त्यांच्याच भाषेत संवाद साधून आरोग्यविषयक माहिती घ्यावी लागते.

-------

सिंहगड हॉस्टेल सेंटरमध्ये सध्या उमेद संस्थेतील ५ रुग्ण दाखल असून, ४ रुग्ण यशस्वीरित्या उपचार घेऊन डिस्चार्ज झाले आहेत. या रुग्णांवर उपचार करताना समाजाचे आपण देणे लागतो ही भवना आम्हा सर्वच अधिकारी सेवकांमध्ये वाढत आहे.

- डॉ.दिप्ती बच्छाव, सेंटरप्रमुख, सिंहगड हॉस्टेल कोविड सेंटर, कोंढवा

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDivyangदिव्यांग