शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus News : केंद्र शासनाच्या शिष्टमंडळाकडून पुण्यातील कोविड उपाययोजना आणि सद्यःस्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 11:32 IST

रुग्णांची संपूर्ण माहिती ठेवण्याच्या आणि मृत्युदर कमी करण्याकरिता काय करता येईल याबाबत मार्गदर्शन

ठळक मुद्देपालिका अधिकाऱ्यांनी दिली माहिती : सीओईपीच्या जम्बो रुग्णालयाची केली पाहणी 

पुणे : शहरातील कोविड उपाययोजना आणि सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने एक शिष्ठमंडळ आले असून नागपूर एम्सचे डॉ. अरविंद कुशवाह यांच्या शिष्ठमंडळाने जम्बो रुग्णालयाची पाहणी केली. तसेच पालिकेत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी उपाययोजनांची माहिती दिली.

जम्बो कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  डॉ. कुशवाह यांनी संपर्क साधून संवाद साधला. तसेच जेवणाचा दर्जा योग्य असल्याची खात्री करून घेतली. दाखल रुग्णांची संपूर्ण माहिती संगणकावर नोंद करण्यात यावी. त्यामुळे रुग्ण बरा होऊन घरी गेल्यानंतर ६ महिन्यानंतर देखील काही त्रास झाल्यास या माहितीचा उपयोग पालिकेला तसेच रुग्णाला होऊ शकतो. संपूर्ण माहिती ठेवण्याच्या आणि मृत्युदर कमी करण्याकरिता काय करता येईल याबाबत डॉ. कुशवाह यांनी मार्गदर्शन केले. रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांकडून जम्बोमधील सोयी सुविधांची माहिती घेतली. ऑक्सिजन बेड, आयसीयू बेडची व्यवस्था, कमांड सेंटरमधील माहिती तंत्रज्ञान प्रणाली, जम्बो रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रुबल अग्रवाल यांनी सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, उपायुक्त राजेंद्र मुठे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे, डॉ. अंजली साबणे आदी अधिकारी उपस्थित होते. ------ महापालिका आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी माहिती दिली. बैठकीत डॉ. अरविंद कुशवाह यांच्यासह शासनाचे वैद्यकिय सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी पालिकेचे अधिकारी, कोविड सेंटरचे प्रमुख, विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी यांना मार्गदर्शन केले. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका