शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

Corona Virus News : पुणे शहरातील कोरोना 'पॉझिटिव्हिटी रेट' अजूनही चिंताजनकच! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 11:59 IST

ऑक्टोबर महिन्यात शहरामध्ये दररोज सरासरी केवळ ३८०० चाचण्या होत आहेत. तर नवीन रुग्ण ७२५ च्या जवळपास आहेत.

ठळक मुद्देमागील काही दिवसांत रुग्ण कमी दिसत असले तरी चाचण्यांचे प्रमाणही तुलनेने कमी झालेले आहे.

पुणे : मागील काही दिवसांत शहरातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने कमी झाला. त्यातुलनेत दैनंदिन चाचण्याही कमी झाल्या आहेत. पण पॉझिटिव्हिटी रेट अजूनही चिंताजनकच असल्याचे आकडेवारीवरून दिसते. सध्या शहरात एकुण चाचण्यांच्या तुलनेत नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) जवळपास २३ टक्के आहे. तर रुग्ण कमी आढळूनही ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सात दिवसांतील हे प्रमाण १९ टक्के एवढे आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही तुलनेने तेवढे कमी झालेले नाही.

ऑक्टोबर महिन्यात शहरामध्ये दररोज सरासरी केवळ ३८०० चाचण्या होत आहेत. तर नवीन रुग्ण ७२५ च्या जवळपास आहेत. मागील महिन्यांत हे प्रमाण उलट होते. दररोज जवळपास साडे पाच हजारांहून अधिक चाचण्या होत होत्या. तर रुग्णही १६०० हून अधिक होते. याच महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्या झाल्या. तसेच दैनंदिन नवीन रुग्ण व मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक राहिले. विशेष म्हणजे पॉझिटीव्हिटी रेट २८ टक्क्यांच्या पुढे गेला होता. म्हणजे १०० जणांपैकी २८ ते २९ जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होत होते.

मागील काही दिवसांत रुग्ण कमी दिसत असले तरी चाचण्यांचे प्रमाणही तुलनेने कमी झालेले आहे. या आठ दिवसांतील पॉझिटिव्हिटी रेट  १९ टक्क्यांच्या पुढे तर मृत्यूदर ४ टक्क्यांच्या पुढे आहे. जून महिन्यांत अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्या वाढल्याचे दिसते. जुलै महिन्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६ टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर पोहचला. सप्टेंबरमध्ये तर हे प्रमाण उच्चांकी ठरले. पण ऑक्टोबरमध्ये चाचण्या कमी झाल्याने पुन्हा हा दर २० टक्क्यांच्या खाली आला आहे. चाचण्या कमी करून कमी झालेला दर आश्वासक नसतो. अधिकाधिक चाचण्या वाढवून जर दर कमी होत असले तर ते दिलासादायक म्हणावे लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. -----------------------मागील काही महिन्यांतील चाचण्या, नवीन रुग्ण व मृत्यूची दैनंदिन सरासरीमहिना                     चाचण्या        नवीन रुग्ण       पॉझिटिव्हिटी रेट        मृत्यूऑक्टोबर (१ ते ७)      ३७९९              ७२२                      १९.०१                २९सप्टेंबर                    ५६५१               १६०७                     २८.४४               ३८ऑगस्ट                    ५५४१              १२७७                     २३.०५                ३१जुलै                         ४९४६               ११६६                     २३.५७                २१जुन                         २११७              ३४७                        १६.४२                १०मे                          १२२१                 १७०                      १३.९९                  ७----------------------------------------------------------                                                        सद्यस्थितीत मागील महिन्याप्रमाणेच चाचण्यांमध्ये वाढ होणे आवश्यक आहे. चाचण्या कमी करण्याइतपत आपली स्थिती सुधारलेली नाही. पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असला तरी तो आणखी नियंत्रणात आणायचा असल्यास चाचण्या वााढविण्याशिवाय पर्याय नाही. पॉझिटिव्हिटी रेट किमान ५ ते १० टक्क्यांपर्यंत आल्यानंतरच तसा विचार केला जाऊ शकतो.- डॉ. भालचंद्र पुजारी, शास्त्रज्ञ, इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टु कोविड-------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्त